Home /News /entertainment /

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील छोट्या परीसाठी संकर्षणची खास पोस्ट ; फोटो शेअर करत म्हणाला....

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील छोट्या परीसाठी संकर्षणची खास पोस्ट ; फोटो शेअर करत म्हणाला....

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परीचा म्हणजे मायराचा आज, 22 जानेवारीला ( mayra vyakul birthday)वाढदिवस आहे. चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  मुंबई, 23 जानेवारी- झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ( mazi tuzi reshimgath) ही मालिका फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे एकत्र दिसत आहेत. या मालिकेत नेहा कामतची भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहरे साकारते आहे. तर बालकलाकार मायराच्या अभिनयाची देखील खुप चर्चा रंगली आहे. मालिकेतील तिचा निरागस अभिनय सर्वांचीच मनं जिंकतोय. मालिकेत ती छोट्या परीची (pari)  भूमिका साकारताना दिसत आहे. आज, 22 जानेवारीला परीचा म्हणजे मायराचा  ( mayra vyakul  birthday)वाढदिवस आहे. चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ( sankarshan karhade) मालिकेत यशचा मित्र समीरची भूमिका साकारतान दिसत आहे. संकर्षण अनेकादा परीसोबतचे क्यूट व्हिडिओ शेअर करत असतो. पडद्यामागे तो परीसोबत धमाल करताना दिसतो. आज मायराच्या वाढदिवासानिमित्ता तिच्यासोबतचे खास फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “बॉस काकांकडून परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....! त्याच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
  मायरा सेटवर सर्वांची लाडकी आहे. ती प्रार्थन बेहेरे तसेच श्रेयश तळपदे यांच्यासोबत अनेक इन्स्टा रील बनवत असते. त्यामुळे देखील ती चर्चेत असते. मायरा खरं तर सोशल मीडिया स्टार आहे. सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे. मायराचे युट्युबवर Myra’s corner नावाने मायराचे चॅनल आहे. मायराचे सर्व अकाउंट तिची आई हँडल करताना पाहायला मिळते. मायराचे वडील गौरव वायकुळ आणि आई श्वेता वायकुळ हे दोघेही मायराला सतत प्रोत्साहन देत असतात. वाचा-'हिच्यापेक्षा तर दीपिका चांगली....', Katrina Kaif एअरपोर्ट लुकमुळे होतेय ट्रोल माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत सध्या यश आणि नेहाच्या मैत्रित दुरावा आला आहे. नेहाचे राहते घर विकल गेले आहे. ते घर यशनीच विकत घेत नेहााल या संकटातून बाहेर काढले आहे. मात्र असं जरी असलं तरी नेहा आजही यशवर नाराज आहे. आता ही जोडी पुन्हा एकत्र कधी येणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या