Home /News /entertainment /

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीला मिळाल मोठा पुरस्कार, बालकलाकार म्हणून मायराचा करण्यात आला विशेष गौरव

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीला मिळाल मोठा पुरस्कार, बालकलाकार म्हणून मायराचा करण्यात आला विशेष गौरव

माझी तुझी रेशीमगाठ : परी फेम मायरला नुकताच एक पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

  मुंबई, 25 मे - माझी तुझी रेशीमगाठ( mazi tuzi reshimgath ) मालिकेत छोट्या परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळ (myra vaikul) सोशल मीडिया स्टार आहे. मालिकेतील छोट्या परीमुळं ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. पण यापूर्वीही तिचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला होता. सध्या देखील तिचे सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओ चाहत्यांचे लक्षवेधून घेत असतात. अनेकजण केवळ परीमुळं आम्ही माझी तुझी रेशीमगाठ( myra vaikul latest video ) ही मालिका पाहत असल्याचे सांगताना दिसतात. इतकी परीची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकत असते. परीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. परी फेम मायरला नुकताच एक पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मायरा वायकुळच्या इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. नृत्यकला निकेतन यांच्याकडून जागतिक नृत्यदिवसाचे निमित्त साधत मायरा वायकुळ हिला दिग्दर्शक केदार शिंदे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. बालकलाकार म्हणून मायराचा गौरव केला. यावेळी तिनं नृत्य देखील केलं. तिच्या सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे. वाचा-अतरंगी ड्रेसमुळे दीपिकाची झाली पंचाईत; गाउनचा पसारा सांभाळण्याच्या नादात ... लहान वयात इतका मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल चाहत्यांनी देखील कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव सध्या सुरूच आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे. तिची निरागसता, बोलण्यातील साधेपणा आणि हसणे, मुरडणे, रुसणे पाहायला खूपच मजा येते. तिचा अभिनय देखील अप्रतिम आहे. खरेतर या मालिकेआधी देखील तिचे अनेक चाहते होते. मायरा वायकुळचे. इन्स्टाग्रामवरही खूप फॉलोअर्स आहेत. युट्युबवर Myra’s corner World Of Myra and Family आणि नावाने मायराचे चॅनेल देखील आहे.
  झी मराठीवरील अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आहे. मालिकेत यशची भूमिका श्रेयस तळपदे तर नेहाची भूमिका प्रार्थना बहेरे साकरताना दिसत आहे. या मालिकेत छोट्या परीची भूमिका साकारणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री मायरा वायकूळ आहे. फक्त आणि फक्त परीसाठी ही मालिका पाहणारे अनेक जण आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee Marathi

  पुढील बातम्या