Home /News /entertainment /

मायरा मेकअप कसा करते पाहिलं आहे का? स्वीट परीचा क्यूट व्हिडिओ व्हायरल

मायरा मेकअप कसा करते पाहिलं आहे का? स्वीट परीचा क्यूट व्हिडिओ व्हायरल

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील छोटी परी फेम मायरा तयार कशी होती हा अनेकांना प्रश्न पडतो. याचाच एक व्हिडिओ( mazi tuzi reshimgath latest Video) समोर आला आहे. यामध्ये स्वीट परी मेकअप (makeup tutorial ) करताना दिसत आहे.

  मुंबई, 30 मार्च- माझी तुझी रेशीमगाठ( mazi tuzi reshimgath ) मालिकेत छोट्या परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळ (myra vaikul) सोशल मीडिया स्टार आहे. मालिकेतील छोट्या परीमुळं ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. पण यापूर्वीही तिचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला होता. सध्या देखील तिचे सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओ चाहत्यांचे लक्षवेधून घेत असतात. अनेकजण केवळ परीमुळं आम्ही माझी तुझी रेशीमगाठ( myra vaikul latest video ) ही मालिका पाहत असल्याचे सांगताना दिसतात. इतकी परीची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकत असते. त्यापैकी एक म्हणजे छोटी परी फेम मायरा तयार कशी होती. याचाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये स्वीट परी मेकअप (makeup tutorial ) करताना दिसत आहे. मायराच्या इन्स्टावर तिच्याविषयी अनेक गोष्टी पाहायला मिळतात. जसं की तिच्या सेटवरच्या गंमती शिवाय तिच्या नवीन व्हॉलगविषयी माहिती मिळत असते. नुकताच तिच्या इन्स्टावर मायराच्या मेकअपचा एक क्यूटवाला व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मायरा हातात ब्रश घेऊन मेकअप करताना दिसत आहे. अगदी मोठ्या मुली मेकअप करतात तसाच काहीसा ती मेकअप करताना दिसत आहे. तिचा हा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तिच्या क्यूटनेसचं कौतुक केलं आहे. वाचा-'देव्हाऱ्यात देवाच्या शेजारी विजू मामांची तसबीर..' भरत जाधवची भावुक पोस्ट मायरचं नुकतचं कोलीवूड प्रॉडक्शन प्रस्तुत आई विना मला करमत नाही हे गाणं आलं आहे. या गाण्यात मायरा मुख्य भूमिकेत आहे. मायरा यामध्ये शाळेच्या गणवेशात दिसत आहे. माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो ह्या लोकप्रिय गाण्याची गायिका दिया वाडकर हिने आई हे गाणं गायलं आहे. मायराच्या या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वाचा-इंद्राने मालिकेत येण्यापूर्वीच जिंकलाय 'महाराष्ट्राज मोस्ट डिझायरेबल मॅन'किताब माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे. तिची निरागसता, बोलण्यातील साधेपणा आणि हसणे, मुरडणे, रुसणे पाहायला खूपच मजा येते. तिचा अभिनय देखील अप्रतिम आहे. खरेतर या मालिकेआधी देखील तिचे अनेक चाहते होते. मायरा वायकुळचे. इन्स्टाग्रामवरही खूप फॉलोअर्स आहेत. युट्युबवर Myra’s corner World Of Myra and Family आणि नावाने मायराचे चॅनेल देखील आहे.
  झी मराठीवरील अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आहे. मालिकेत यशची भूमिका श्रेयस तळपदे तर नेहाची भूमिका प्रार्थना बहेरे साकरताना दिसत आहे. या मालिकेत छोट्या परीची भूमिका साकारणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री मायरा वायकूळ आहे. फक्त आणि फक्त परीसाठी ही मालिका पाहणारे अनेक जण आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या