Home /News /entertainment /

माझी तुझी रेशीमगाठ मधील छोट्या परीच्या कुटुंबात पसरली शोककळा ; परीच्या आईची भावनिक पोस्ट

माझी तुझी रेशीमगाठ मधील छोट्या परीच्या कुटुंबात पसरली शोककळा ; परीच्या आईची भावनिक पोस्ट

माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ हिच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. परी म्हणून ओळखली जाणाऱ्या मायराच्या आजोबांचे निधन झाले आहे.

  मुंबई, 11 नोव्हेंबर- माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ हिच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. परी म्हणून ओळखली जाणाऱ्या मायराच्या आजोबांचे निधन झाले आहे. मायराची आई म्हणजेच श्वेता वायकुळ (shweta vaikul)यांनी त्यांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. परीची आई श्वेता वायकुळ यांनी फोटो शेअर करत म्हटलं आहे की ” पप्पा तुमच्यामुळे मला ही दुनिया कळली. तुमच्यामुळे मी आयुष्याची अनेक वळणे पाहिली. कधीही सोडली नाही तुम्ही माझी साथ का सोडून गेलात आज, तुम्हीच होता माझ्या जीवनाचा आधार. मायराचे कौतुक जेव्हा तुमच्या डोळ्यात दिसले तेव्हा खूप प्रसन्न वाटले मला. का थांबला नाहीत तिचं अजून कौतुक करायला. आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे, माझ्या जगण्याला अर्थ आहे केवळ तुमच्यामुळे, माहिती नाही तुमच्याशिवाय मी पुढचं आयुष्य कसं जगेल, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला कॉल करून विचारायची प्रत्येक सुखात तुम्ही माझ्या सोबत होता. वाचा : विकी-कतरिना लग्नानंतर कुठं कुठं जाणार हनीमूनला; असा आहे प्लॅन तुमच्या शिवाय कास सामोरे जाऊ प्रत्येक गोष्टीला काहीच काळात नाही, कोण येईल माझ्या एका कॉल वर मला भेटायला खूप खूप आठवण येते पपा का गेलात तुम्ही? तुमच्या शिवाय जगायची सवय नाही हो मला. अचानक निघून गेलात बराच काही बोलायचं राहून गेलं स्वतःची काळजी न करता इतरांसाठी जगात राहिलात नेहमी सकारात्मक आमी प्रसन्न असायचा तुम्ही आणि तेच आम्हाला हि शिकवला. तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
  माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्ही आहेत. माहित आहे तुम्ही परत नाही येनार पण माझ्या प्रत्येक गोष्टीत माझे बाबा आहेत. तुमचा प्रत्येक गुण माझ्या मायरामध्ये आहे आणि त्याचा खूप अभिमान आहे मला.आम्हाला कसलीच कधी कमी पडू दिली नाही तुम्ही. 15 दिवस कसे काढले तुमच्या शिवाय कस सांगू तुम्हाला.. प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला तुमची आठवण येते Papa….Miss You Papa Forever. वाचा : 'आई कुठं काय करते' मधील संजनाचा पैठणीतील तोरा पाहून चाहते घायळ! माझी तुझी रेशीमगाठ मालिकेमुळे परी म्हणजेच मायर घराघरात पोहचली पण त्या आधी देखील तिच्या यु ट्यूब चायनलमुळे ती सर्वपरिचित होतीच. आता ह्या मालिकेतून तिच्या अभिनयाने तिने अनेकांची मने जिंकली आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या