काय आहे नेमकं प्रकरण? धनश्रीला डिसेंबर 2021 मध्ये एका वेबसिरीजमध्ये काम करण्यासाठी विचारण्यात आले होते. बालाजी टेलिफिल्म्सकडून तिला ही ऑफर आली होती. कास्टिंग बालाजी टेलिफिल्म्स डॉट कॉम या इमेल आयडीवरून तिला यासंदर्भात सिलेक्शन झाले असा मेल आला होता. तिच्याबाबतची माहिती टॅलेंट ट्रॅक ह्यांच्याकडून मिळाली असे तिला सांगण्यात आले. बालाजी टेलिफिल्म्स असल्याने धनश्रीने या गोष्टीवर विश्वास ठेवला. मुंबई आणि हैदराबाद येथे या वेबसिरीजचे शूटिंग होणार आणि ते झी 5 वर दिसणार असे तिला सांगण्यात आले होते. त्यासाठी डॉक्युमेंटस पाठवून तिला मुंबई ऑफिसला जावे लागेल असे सांगितले. परंतु मुंबई ऑफिस बंद पडत असल्याने ह्याची प्रोसेस हैद्राबादलाच होईल असे तिला कळवण्यात आले. हैद्राबादला विमानाने येण्यासाठी ‘बालाजी 20’ असा एक प्रोटोकॉल तिला दिला गेला आणि तिकीट बुक करण्यासाठी सांगितले. यागोदरही धनश्रीने असे प्रोजेक्ट्स केले होते त्यामुळे तिला याबाबत काहीच शंका आली नाही. परंतु तिकीट बुक करायच्या वेळेस प्रोसेस होत नसल्याचे तिने त्यांना कळवले.View this post on Instagram
इंडिगोकडून तिकीट बुक केले आहे मात्र त्याचे पेमेंट पेंडिंग आहे असा एक रेकॉर्ड कॉल धनश्रीला आला होता. त्यांनी धनश्रीला एक नंबर पाठवून 22 हजार 348 रुपये एवढी विमानाच्या तिकीटाची रक्कम गुगलपे करण्यास सांगितली. ९ फेब्रुवारी 2022 रोजी गुगलपे करताना स्क्रीनवर इंडिगोच नाव समोर आलं आणि तुमची सीट बुक झाली असा एक मेल तिला आला. मात्र ह्या प्रोसेस मध्ये काही वेळ जाईल असे तिला सांगण्यात आले. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजताची फ्लाईट होती त्यामुळे ही प्रोसेस लवकर कन्फर्म व्हावी अशी मागणी तिने केली होती. आधल्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत तिने त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला असता कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने तिची फसवणूक झाली असल्याचे तिला वाटले. तेव्हा तिने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली. या घडलेल्या प्रकाराची माहिती देणारा व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला होता. याप्रकरणी धनश्रीला सर्वांनी पाठींबा दिला होता आता धनश्रीला न्याय मिळवून देण्यात पोलिसांना यश आलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial