Home /News /entertainment /

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणूक, काम देतो म्हणून घातला इतक्या रूपयांचा गंडा

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणूक, काम देतो म्हणून घातला इतक्या रूपयांचा गंडा

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर आहे. नुकतीच या मालिकेत एका नवख्या अभिनेत्रीची एंट्री झाली होती. तिची कामच्या नावाखाली फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

  मुंबई, 16 फेब्रुवारी- झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर आहे. नुकतीच या मालिकेत एका नवख्या अभिनेत्रीची एंट्री झाली होती. आता या अभिनेत्रीबद्दल( dhanashri bhalekar ) एक नवीन माहिती समोर आली आहे. तिची काम देतो म्हणून फसवणूक झाल्याचे समोर आलं आहे. तिनं याबद्दल पोलिसात तक्रार देखील केली आहे. शिवाय एक व्हिडिओ पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. नुकतेच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सूनयना केरकर हे पात्र दिसले होते. यशसोबत लग्नाची बोलणी करायला ही सूनयना तिच्या आई वडिलांसोबत यशच्या घरी आली होती. सूनयनाचे पात्र मालिकेत एकाच भागासाठी मर्यादित होते. मात्र ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. हे पात्र अभिनेत्री धनश्री भालेकर हिने निभावले होते. धनश्रीने याअगोदर हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्यासोबत एक फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंबंधी सर्व माहिती तिनं व्हिडिओच्या माध्यामातून शेअर केली आहे. वाचा-बप्पी लहरी आनंद शिंदेना म्हणायचे, 'तू मराठीचा....'; उत्कर्षने सांगितली आठवण धनश्री भालेकरने याबद्दल इन्स्टावर एक व्हि़डिओ पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, कास्टिंग बालाजी टेलिफिल्म्स डॉट कॉम या इमेल आयडीवरून तिला यासंदर्भात सिलेक्शन झाले असा मेल आला होता. तिच्याबाबतची माहिती टॅलेंट ट्रॅक ह्यांच्याकडून मिळाली असे तिला सांगण्यात आले. बालाजी टेलिफिल्म्स असल्याने धनश्रीने या गोष्टीवर विश्वास ठेवला. मुंबई आणि हैदराबाद येथे या वेबसिरीजचे शूटिंग होणार आणि ते झी 5 वर दिसणार असे तिला सांगण्यात आले होते. त्यासाठी डॉक्युमेंटस पाठवून तिला मुंबई ऑफिसला जावे लागेल असे सांगितले. परंतु मुंबई ऑफिस बंद पडत असल्याने ह्याची प्रोसेस हैद्राबादलाच होईल असे तिला कळवण्यात आले. हैद्राबादला विमानाने येण्यासाठी ‘बालाजी 20’ असा एक प्रोटोकॉल तिला दिला गेला आणि तिकीट बुक करण्यासाठी सांगितले. यागोदरही धनश्रीने असे प्रोजेक्ट्स केले होते त्यामुळे तिला याबाबत काहीच शंका आली नाही. परंतु तिकीट बुक करायच्या वेळेस प्रोसेस होत नसल्याचे तिने त्यांना कळवले. इंडिगोकडून तिकीट बुक केले आहे मात्र त्याचे पेमेंट पेंडिंग आहे असा एक रेकॉर्ड कॉल धनश्रीला आला. त्यांनी धनश्रीला एक नंबर पाठवून 22 हजार 348 रुपये एवढी विमानाच्या तिकीटाची रक्कम गुगलपे करण्यास सांगितली.9 फेब्रुवारी 2022रोजी गुगलपे करताना स्क्रीनवर इंडिगोच नाव समोर आलं आणि तुमची सीट बुक झाली असा एक मेल तिला आला. मात्र ह्या प्रोसेस मध्ये काही वेळ जाईल असे तिला सांगण्यात आले. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजताची फ्लाईट होती त्यामुळे ही प्रोसेस लवकर कन्फर्म व्हावी अशी मागणी तिने केली होती. आधल्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत तिने त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला असता कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने तिची फसवणूक झाली असल्याचे तिला वाटले.
  ज्या व्यक्तीने तिचे नाव वेबसिरीजसाठी सुचवले होते त्या अनिकेत कुमार चा देखील कुठलाच रिप्लाय तिला मिळाला नाही. अनेक फोन केले मेसेजेस केले पण कुठलाच रिप्लाय तिला आला नसल्याने शेवटी पोलिसांकडे तक्रार करेन असे सांगितल्यावर त्यांनी केवळ ‘wait’ एवढाच रिप्लाय दिला. त्यामुळे ह्या गोष्टींवर विश्वास ठेवावा की नाही? माझी फसवणूक झाली आहे की नाही?. असा मोठा प्रश्न तिच्यासमोर उपस्थित झाला. ही गोष्ट माझ्यासोबत घडली पण ती इतर कोणासोबत घडू नये म्हणून तिने ही माहिती शेअर करून कलाकारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
  धनश्रीने यासंदर्भात मुंबईतील बालाजी टेलिफिल्म्सच्या ऑफिसमध्ये जाऊन माहिती दिली आहे. पण त्यांनी देखील हे नंबर आणि नावं ओळखीचे नसल्याचे सांगितले आहे. बालाजी टेलिफिल्म्स वाल्यांविरोधात माझी कुठलीही तक्रार नाही पण ऑफिशियल डोमेन कोणीही बनवू शकतं का? हा प्रश्न मला आहे त्यामुळे हे नंबर मी पोलिसांना देखील कळवले आहेत आणि तक्रार दाखल केली असल्याचे तिनं सांगितलं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या