Video : परीचा Vacation Mode On! मायराचा 'आज ब्लू है पानी पानी' गाण्यावर क्यूट डान्स!
Video : परीचा Vacation Mode On! मायराचा 'आज ब्लू है पानी पानी' गाण्यावर क्यूट डान्स!
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. मग मायरा (myra vaikul Latest Video)देखील सुट्टयांचा आनंद घेत आहे. तिचा सध्या स्विमिंग पूलजवळचा एक मस्ती करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
मुंबई, 4 मे- झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ( mazi tuzi reshimgath ) मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. यश आणि नेहाची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. याशिवाय या मालिकेतील छोटी परी देखील प्रेक्षकांची तितकीच आवडती आहे. छोट्या परीची भूमिका मायरा वायकुळ (myra vaikul) साकारताना दिसते. मायरा तिच्या निरागस अभिनयाने सर्वांचे मन जिंकताना दिसते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. मग मायरा (myra vaikul Latest Video)देखील सुट्टयांचा आनंद घेत आहे. तिचा सध्या स्विमिंग पूलजवळचा एक मस्ती करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये मायरा नेहमीच्या स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे.
मायराच्या इन्स्टावर तिच्या एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मायरा आज ब्लू है पानी पानी..या गाण्यावर स्विमिंग पूलाजवळ डान्स करताना दिसत आहे. मायरा सध्या सुट्टयांचा आनंद घेत असल्याच या व्हिडिओत दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अशातच मायरा तिच्या आई वडिलांसोबत स्विमिंग पूला ट्रीटचा आनंद घेताना दिसत आहे. मायराचा हा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. छोट्या परीच्या या क्यूट व्हिड़िओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
वाचा-'आम्ही एकमेकांचे सांता' क्रांती रेडकरने 'या' व्यक्तीसाठी लिहिली खास पोस्ट
मायरा नुकतीच कोलीवूड प्रॉडक्शन प्रस्तुत ‘आई’ या गाण्यात मुख्य भूमिकेत दिसली होती. आई विना मला करमत नाही, असे म्हणत मायरा आई या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आली आहे. मायरा यामध्ये शाळेच्या गणवेशात दिसत आहे. माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो ह्या लोकप्रिय गाण्याची गायिका दिया वाडकर हिने आई हे गाणं गायलं आहे. मायराच्या या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
झी मराठीवरील अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आहे. मालिकेत यशची भूमिका श्रेयस तळपदे तर नेहाची भूमिका प्रार्थना बहेरे साकरताना दिसत आहे. या मालिकेत छोट्या परीची भूमिका साकारणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री मायरा वायकूळ आहे. फक्त आणि फक्त परीसाठी ही मालिका पाहणारे अनेक जण आहेत.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.