Mazi Tuzi Reshimgath Latest Updateमुंबई, 8 जून- झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ' (Mazi Tuzi Reshimgath) मालिकेत सध्या नेहा आणि यशाच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. नुकताच यश आणि नेहाचा साखरपुडा पार पडला. नेहा आणि यशाच्या लग्नसोहळ्याचा थाट काही वेगळाच आहे. या सोहळ्याच्या आधी सगळे कार्यक्रम देखील अगदी दिमाखदार (Mazi Tuzi Reshimgath Latest Update) पद्धतीने पार पडणार आहेत.
आता प्रेक्षक मालिकेत पाहू शकतील की, साखरपुड्या नंतर यशचे मित्र बॅचलर पार्टी करायचं ठरवतात. शेफालीला याची खबर मिळते. ती समीरवर नजर ठेवण्यासाठी नेहाला तिथे घेऊन जाते. पण काही गैरसमजामुळे यश मुलींच्या गराड्यात अडकलेला नेहा पाहाते आणि रुसून निघून जाते.
वाचा-मालिकांमध्ये लगीन घाई! नेहा-यश, शांतनू-पल्लवीनंतर कोणती जोडी बांधणार लगीनगाठ?
रुसलेल्या नेहाचा राग घालवण्यासाठी काही खास पाहुणे मेंदीच्या ( neha mehendi ceremony look ) कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आता हे पाहुणे नक्की कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरून नका माझी तुझी रेशीमगाठ लग्न विशेष सप्ताह सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.
वाचा-ह्रता दुर्गुळेला वाटतंय 'तो' दिवस कधीच संपू नये.., अभिनेत्रीची नवीन पोस्ट चर्चेत
नेहाने मेंदी रंगाचा घागरा घातला आहे. ती खूपच सुंदर दिसत आहे. शिवाय तिच्या मेंदी समारंभासाठी सेट देखील छाना सजवला आहे. लवकच नेहाच्या हाथावर यशच्या प्रेमाचा रंग चढलेला दिसेल. प्रेक्षक खूप दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची वाट पाहत होते. आता तो योग्य जुळून आला आहे.
मागच्या काही दिवसांपासून मालिका विश्वात यश आणि नेहाच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. लग्नापूर्वीचे कार्यक्रम मालिकेत दाखण्यात सुरूवात झाली आहे. शिवाय या दोघांच्या लग्नाचे शुटींग देखील पूर्ण झालं आहे. कारण या दोघांचा लग्नातील रॉयल लुक असेल किंवा परीचा वरातीतील डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एकूणच प्रेक्षक मात्र हा सोहळा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.