Home /News /entertainment /

VIDEO : यशची नवरीबाई नटली मेंदी समारंभासाठी! समोर आला नेहाचा पहिला लुक

VIDEO : यशची नवरीबाई नटली मेंदी समारंभासाठी! समोर आला नेहाचा पहिला लुक

Mazi Tuzi Reshimgath : नेहाचा मेंदी ( neha mehendi ceremony look ) लुक समोर आला आहे. लवकरच नेहाला यशच्या नावाची मेदी लागणार आहे.

  मुंबई, 1 जून : माझी तुझी रेशीमगाठ ' (Mazi Tuzi Reshimgath) मालिका सध्या एक वेगळ्या वळणावर आहे. आजोबांनी यश आणि नेहाच्या लग्नाला परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच यशच्या घऱी सनई चौघडे वाजणार आहेत. होय तिकडं लग्नापूर्वीच्या काही कार्यक्रमांना सुरूवात देखील झाली आहे. नेहाचा मेंदी (  neha mehendi ceremony look  )  लुक देखील समोर आला आहे. यश आणि नेह सर्वांची आवडती जोडी आहे. नेहाची भूमिका अभिनेत्री प्रार्था बेहेरे तर यशची भूमिका श्रेयस तळपदे साकारताना दिसतो. छोड्या पडद्यावरील लोकप्रिय अशी ही जोडी लवकरच मालिकेत रेशीमगाठ बांधणार आहे. या दोघांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना देखील सुरूवात झाली आहे. नेहाला यशच्या नावाची मेंदी लागणार आहे. यासाठी नवराई नेहा छान नटली देखील आहे. तिचा मेंदी लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेहाने मेंदी रंगाचा घागरा घातला आहे. ती खूपच सुंदर दिसत आहे. शिवाय तिच्या मेंदी समारंभासाठी सेट देखील छाना सजवला आहे. लवकच नेहाच्या हाथावर यशच्या प्रेमाचा रंग चढलेला दिसेल. प्रेक्षक खूप दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची वाट पाहत होते. आता तो योग्य जुळून आला आहे.
  लवकरच ही जोडी लग्न करणार आहे. छोट्या पडद्यावरील सर्वांत ग्रॅंड लग्न नेहा आणि यशचं असल्याची सध्या चर्चा आहे. लग्नापूर्वी अर्थातच येत्या भागात यश आणि नेहाचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेचे नवे प्रोमो पाहायला मिळत आहेत. यामध्ये नेहा आणि यश आपल्या साखरपुड्यासाठी पारंपरिक अंदाजात नटलेले दिसून येत आहेत. नेहाने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. केसांत गजरा माळला आहे. शिवाय सुंदर अशी ऑक्सइड ज्वेलरी घातली आहे. नेहाचा हा लूक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाय साखरपुड्यानंतर चिमुकली परी सर्व प्रेक्षकांना लग्नाला येण्याचा गोड आग्रह करताना दिसून येत आहे. प्रेक्षक मालिकेतील हा ट्रॅक पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत. आता  यानंतर नेहाचा मेंदी लुक सगळीकडे व्हायरल होत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या