Home /News /entertainment /

माझी तुझी रेशीमगाठ : परीमुळे यशच्या आयुष्यात होणार मोठी घडामोड; कंपनीसाठी करणार महत्त्वाचं काम

माझी तुझी रेशीमगाठ : परीमुळे यशच्या आयुष्यात होणार मोठी घडामोड; कंपनीसाठी करणार महत्त्वाचं काम

माझी तुझी रेशीमगाठ : नेहाला ऑफीसच्या कामसाठी अचानक लंडनला जावं लागलं आहे. अशात यशवर परीची सगळी जबाबदारी आली आहे.

  मुंबई, 10 मे- माझी तुझी रेशीमगाठ( mazi tuzi reshimgath )   मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. याशिवाय छोटी परी देखील तिच्या निरागस अभिनयाने सर्वांचे लक्षवेधून घेत असते. सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर ( mazi tuzi reshimgath latest episode )  आहे. नेहाला ऑफीसच्या कामसाठी अचानक लंडनला जावं लागलं आहे. अशात यशवर परीची सगळी जबाबदारी आली आहे. मात्र परीमुळं यशची एक महत्त्वाची डिल क्रॅक झाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार, परीमुळं यशची एक महत्त्वाची परदेशी कंपनीसोबतची डिल क्रॅक झाली आहे. यामुळं यश परीचं कौतुक तर करतोय शिवाय परीची ओळख परदेशी क्लाईंटसमोर त्याची मुलगी अशी करून देतोय. परीनं देखील यशला तिचा बाबा म्हणून स्वीकरलं आहे. म्हणून तर तिनं यश आणि नेहाच्या लग्नाला परवानगी दिली आहे. हाळूहाळू का होईना यश आणि परीचं नातं बाप लेक म्हणून घट्ट होताना दिसत आहे. परीच्या येण्यामुळं पॅलेसमधील वातावरण देखील बदलून गेलं आहे. यशच्य़ा घरातील मंडळी परीमुळं परत एकत्र आली आहे. यशच्या घरचे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात, हे सगळं परीच्या येण्यामुळं झालं आहे. वाचा-Video : 'देवमाणूस' मालिकेत जामकरांच्या डान्सची आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली दखल! नेहा कंपनीच्या कामानिमित्त अचानक लंडनला गेली आहे. नेहा जरी लंडनला गेली असलं तरी यशच्या घरातील सर्व मंडळी परीची काळजी घेताना दिसते. त्यामुळे परीसाठी नेहानं आता काळजी करण्याची गरज नाही. परीला आता तिच्या हक्काच घर आणि माणसं देखील मिळाली आहेत. त्यामुळे नेहा लंडनवरून परत आल्यावर परीचं आणि यशच्या कुटुंबाचं खास बॉन्डिंग झालेले पाहायला मिळणार हे नक्की आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  नेहाची भूमिका मालिकेत प्रार्थना बेहेरे साकारताना दिसत आहे. मात्रा प्रार्थना सध्या नवऱा अभिषेकसोबत लंडन ट्रीपवर आहे. त्यामुळे नेहा सध्या मालिकेत दिसत नाहीत. मात्र नेहाला सध्या प्रेक्षक खूप मिस करत आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या