Home /News /entertainment /

माझी तुझी रेशीमगाठ : नेहा यशची होणारी बायको म्हणून येणार चौधरींच्या पॅलेसवर, सिम्मी कसं करेल नेहाचं स्वागत?

माझी तुझी रेशीमगाठ : नेहा यशची होणारी बायको म्हणून येणार चौधरींच्या पॅलेसवर, सिम्मी कसं करेल नेहाचं स्वागत?

mazi tuzi reshimgath : नेहा लवकरच चौधरींच्या पॅलेसवर यशची होणारी बायको म्हणून येणार आहे. यावेळी यशच्या घरची मंडळी तिचं स्वागत कसं करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

  मुंबई, 9 डिसेंबर- झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ( mazi tuzi reshimgath ) मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. यश आणि नेहाची जोडी प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. सध्या मालिकेत यश आणि नेहाचा लव्हट्रॅक सुरू आहे. यशनं रोमॅंटिक डिनर डेटचा प्लॅन करून नेहासमोर प्रेम व्यक्त केले आहे. आता या सगळ्यानंतर नेहा लवकरच चौधरींच्या पॅलेसवर यशची होणारी बायको म्हणून येणार आहे. यावेळी यशच्या घरची मंडळी तिचं स्वागत कसं करणार याची सर्वांना ( Mazi tuzi reshimgath latest episode ) उत्सुकता लागली आहे. एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, लवकरच नेहा यशाची होणारी बायको म्हणून चौधरींच्या पॅलेसवर येणार आहे. यावेळी घरातील सर्व मंडळी उपस्थित असणार आहे. या सगळ्यात सिम्मी नेहाचं स्वागत कसं कराणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय यशच्या आजोबांची देखील कशी प्रतिक्रिया असणार याची सर्वांना उत्सुकता आहे. वाचा-बायकोला माहीत नाहीत, तेवढे माझे सिक्रेट श्रेयाला माहित, कुशलचा video.. प्रेक्षक मात्र हा भाग पाहण्यासाठी उत्सुक आहेत. कारण मागच्या किती तरी दिवसांपासून त्यांना त्यांच्या आवडत्या जोडीला एकत्र पाहायचे आहे. नेहा आणि यशचं लग्न पाहायचे आहे. सिम्मी असताना नेहा आणि यशचं लग्न कसं होणार हा देखील प्रश्न आहे. ती या दोघांच्या नात्यात अडचणी निर्माण करणार का, याचा उलगडा येणाऱ्या भागातच होणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  यशच्या आजोबांना नेहाचं सत्य अजून समजलेले नाही. जेव्हा त्यांना नेहाला एक मुलगी असल्याचे समजेल तेव्हा ते यश आणि नेहाच्या लग्नाला परवानगी देणार का....हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नेहा आणि यशने जरी एकमेकांसमोर प्रेम भावना व्यक्त केली असली तरी या दोघांच्या रेशीमगाठी जुळायला खूप अडचणींचा सामना करावा लागणार हे नक्की आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या