Home /News /entertainment /

Sankarshan Karhade: 'तुमच्या उत्साहाने माझ्यावर ही काय वेळ आली...' शेफालीसाठी समीरने घेतला भन्नाट उखाणा

Sankarshan Karhade: 'तुमच्या उत्साहाने माझ्यावर ही काय वेळ आली...' शेफालीसाठी समीरने घेतला भन्नाट उखाणा

किचन कल्लाकारच्या मंचावर माझी तुझी रेशीमगाठ मधल्या रील लाईफ कलाकारांचं लग्न झालं. आणि पाहुण्यांनी बरीच धमाल सुद्धा केली.

  मुंबई 3 जुलै: माझी तुझी रेशीमगाठ (mazi tuzi reshimgath) मालिकेमध्ये नुकतंच नेहा आणि यशचं लग्न पार पडलं. आता चाहत्यांना उत्सुकता होती की शेफाली आणि समीरची लव्हस्टोरी काय वळण घेणार. जे प्रेक्षक समीर आणि शेफाली यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ‘किचन कल्लाकार’च्या (kitchen kallakar) मंचावर पाहुण्यांनी मिळून समीर आणि शेफाली यांचं लग्न लावून दिलं आणि नुसतंच लावून नाही दिलं तर त्यापुढे बरीच धमाल सुद्धा केली. शेफाली अर्थात अभिनेत्री (kajal kate) काजल काटे, (pushkar jog) पुष्कर जोग आणि (madhuri pawar) माधुरी पवार हे पाहुणे नुकतेच किचन कल्लाकारच्या मंचावर येऊन गेले. त्यावेळी पाहुण्यांनी उत्साहात येऊन समीर आणि शेफाली यांचं लग्नचं लावून दिलं. हार घालण्यापासून सगळे विधी या पाहुण्यांनी पार पाडले. आणि मुख्य म्हणजे सगळ्यात लक्षवेधी ठरलं ते म्हणजे उखाणे. संकर्षण कऱ्हाडे या अभिनेत्याने काजलसाठी भूमिकेत राहून एक मस्त उखाणा घेतला. “तुमच्या सगळ्यांच्या उत्सहाने माझी ही काय अवस्था झाली, मला वाटलं मिळेल एखादी नेहासारखी पण मिळाली शेफाली” असा जबरदस्त उखाणा घेऊन संकर्षणने सगळ्यांना डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवलं. शेफालीने सुद्धा उपर एक असं म्हणत याहून कम्माल उखाणा घेतला. “मोगऱ्याचं फुल हलत कसं डुलुडुलु, समीरराव आमचे डुकराचं पिलू” असा अफलातून उखाणा शेफालीने घेतला.
  यानंतर दोघांनी खास एका रोमँटिक गाण्यावर डान्स सुद्धा केला. त्यांच्या या छोटेखानी लग्नसोहळ्याच्या आलेल्या पाहुण्यांनी दमदार आनंद लुटला. संकर्षणची वरात एका लहान मुलांच्या खेळण्यातल्या बाईकवरून आणण्यात आली. हे सगळं बघताना पाहुण्यांना आणि प्रेक्षकांना सुद्धा हसू अनावर होत होतं. संकर्षणचा चेहरा अख्ख्या लग्नात अगदी पाहण्यासारखा झाला होता. या धमाल भागामध्ये आणखी बरीच गंमत जम्मत झाली. हे ही वाचा- Bahurangi Ashok: अशोक मामांचे सुपरहिट डायलॉग अन् भन्नाट मिम्स! तुम्ही पाहिलेत का? ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत आता समीर आणि शेफालीचा रोमँटिक ट्रॅक लवकरच पाहायला मिळणार आहे. नेहा आणि यशच्या लग्नात चोरून प्रेम करणारं हे जोडपं आता काय काय करेल हे बघायला प्रेक्षकांना मजा येईलच.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Tv actors, Tv shows, Zee Marathi

  पुढील बातम्या