Home /News /entertainment /

फॅमिली फंक्शनमध्ये बिझी आहे चिमुकली परी; एन्जॉय करतेय काकाचं डेस्टिनेशन वेडिंग

फॅमिली फंक्शनमध्ये बिझी आहे चिमुकली परी; एन्जॉय करतेय काकाचं डेस्टिनेशन वेडिंग

छोट्या (Tv Shows) पडद्यावर सध्या अनेक बालकलार उत्कृष्ट अभिनय कौशल्य दाखवत आहेत. आपल्या क्युट अंदाजाने या बालकलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) फेम परी अर्थातच मायरा वैकुळ (Pari Aka Myra Vaikul) होय.

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 जून-   छोट्या  (Tv Shows)  पडद्यावर सध्या अनेक बालकलार उत्कृष्ट अभिनय कौशल्य दाखवत आहेत. आपल्या क्युट अंदाजाने या बालकलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'  (Mazi Tuzi Reshimgath)  फेम परी अर्थातच मायरा वैकुळ  (Pari Aka Myra Vaikul)  होय. मायरा या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. तिला या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. चिमुकली मायरा आपल्या गोड अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेमुळे परी म्हणजेच मायर घराघरात पोहचली पण त्या आधीदेखील तिच्या यु ट्यूब चॅनेललमुळे ती सर्वपरिचित होतीच. आता ह्या मालिकेतून तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शिवाय ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अर्थातच तिचे सोशल मीडिया हॅन्डल्स तिची आई श्वेता वैकुळ या हॅन्डल करातात. त्या सतत नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. नुकतंच मायराच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एक बुमरँग आहे. यामध्ये मायरा एका मेहंदी फंक्शनमध्ये नवरीमुलीसोबत दिसून येत आहे. शिवाय या नवरीच्या हातावर सुंदर मेहंदी काढलेली दिसत आहे. वास्तविक मायराच्या काकाचं लग्न आहे. मायराने आपल्या काकीसोबतचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या मायरा आपल्या या फॅमिली फंक्शनमध्ये धम्माल करत आहे. (हे वाचा:'बिग बॉस मराठी' फेम आदिश वैद्य झाला रोमँटिक,गर्लफ्रेंड अभिनेत्रीनं शेअर केला क्यूट मिरर सेल्फी ) श्वेता वैकुळ यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरसुद्धा नुकतंच मायराच्या काकाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. यामध्ये त्यांनी हॅशटॅग वापरत साखरपुडा असल्याचं सांगितलं होतं. तसेच ही एक डेस्टिनेशन वेडिंग असल्याचंसुद्धा त्यांनी हॅशटॅगमध्ये मेन्शन केलं होतं. अर्थातच मायरा शूटिंगमधून वेळ काढून आपल्या काकाचं डेस्टिनेशन वेडिंग एन्जॉय करत आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

    पुढील बातम्या