मुंबई, 27 एप्रिल- झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ( mazi tuzi reshimgath ) मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. यश आणि नेहाची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. याशिवाय या मालिकेतील छोटी परी देखील प्रेक्षकांची तितकीच आवडती आहे. छोट्या परीची भूमिका मायरा वायकुळ (myra vaikul) साकारताना दिसते. मायरा तिच्या निरागस अभिनयाने सर्वांचे मन जिंकताना दिसते. आता मायराचा एक क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओत छोटी परी नेहा कामत झालेली दिसत आहे. ती नेहा कामतसारख्या एक्सप्रेशन देताना दिसत आहे.
मायराच्या इन्स्टावर मायरा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की,परी जेव्हा नेहा बनते 😍..य़ा व्हिडिओमध्ये मायराचे वडील तिला नेहा म्हणून हात मारताना दिसत आहे. तेव्हा मायरा लगेच मागे वळून पाहते. तेव्हा ती नेहा सारख्या एक्सप्रेशन देताना दिसत आहे. यावेळी परी कुठं आहे असा प्रश्न विचारताच ती म्हणते की, ती अभ्यास करत आहे..
वाचा-देशमुख कुटुंब आणि अरुंधती येत आहेत जवळ मात्र अभिनं घेतला मोठा निर्णय
मायराचा हा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. छोट्या परीच्या या क्यूट व्हिड़िओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत मायराच्या क्यूटनेसचे कौतुक केलं आहे. अनेकांनी क्यूटनेस ओव्हरलोड अशा कमेंट केल्या आहेत.
वाचा-'चंद्रा'ची माधुरी दीक्षितला भुरळ, 'चंद्रमुखी'चं पोस्टर शेअर करत म्हणाली..
मायरा नुकतीच कोलीवूड प्रॉडक्शन प्रस्तुत ‘आई’ या गाण्यात मुख्य भूमिकेत दिसली होती. आई विना मला करमत नाही, असे म्हणत मायरा आई या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आली आहे. मायरा यामध्ये शाळेच्या गणवेशात दिसत आहे. माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो ह्या लोकप्रिय गाण्याची गायिका दिया वाडकर हिने आई हे गाणं गायलं आहे. मायराच्या या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
झी मराठीवरील अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आहे. मालिकेत यशची भूमिका श्रेयस तळपदे तर नेहाची भूमिका प्रार्थना बहेरे साकरताना दिसत आहे. या मालिकेत छोट्या परीची भूमिका साकारणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री मायरा वायकूळ आहे. फक्त आणि फक्त परीसाठी ही मालिका पाहणारे अनेक जण आहेत.हेत.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.