Home /News /entertainment /

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्रीला मिळाला नवा सिनेमा, झळकणार मोठ्या पडद्यावर!

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्रीला मिळाला नवा सिनेमा, झळकणार मोठ्या पडद्यावर!

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ कमी काळात प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झाली आहे. आता या मालिकेतील एका अभिनेत्रीला नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे. लवकरच ही अभिनेत्री मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

  मुंबई, 5 मे- झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ( mazi tuzi reshimgath )कमी काळात प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झाली आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसता. मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिका साकारत आहे. या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना देखील खूप आवडते. शिवाय छोटी परी म्हणजे मायरा वायकुळ देखील निरागस अभिनयाने सर्वांचे मन जिंकताना दिसते. आता या मालिकेतील एका अभिनेत्रीला नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे. लवकरच ही अभिनेत्री मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तिला एका नवीन सिनेमा मिळाला आहे. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून स्वाती पानसारे ( swati pansar ) आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत अभिनेत्री स्वाती पानसरे यशच्या काकूची भूमिका साकारताना दिसते. मालिकेत तिचं नाव मिथिला आहे. नवऱ्याच्या प्रेम न मिळणारी साधी सरळ आणि तितकीच प्रेमळ मिथिला सर्वांची आवडती झाली आहे. आता तिला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे. 'आय एम सॉरी' (I Am Sorry ) या मराठी चित्रपटात स्वाती पानसारे महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. येत्या 13 मे रोजी 'आय एम सॉरी' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वाचा-'आता आपण एकटे नसू..' बाळू मामाच्या नावानं चांगभलं फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत 'आय एम सॉरी' सिनेमात मराठी चित्रपटांसोबतच सन टीव्हीवरील जाऊ नको दूर बाबा तसेच 'तेरी लाडली मैं' या हिंदी मालिकेत झळकलेली मयूरी कापडणे यात मुख्य भूमिकेत दिसणार असून तिच्या जोडीला रियाज मुलाणी आहे. याखेरीज अनुराग शर्मा, नेहा तिवारी, राजन ताम्हाणे, समीरा गुजर, कौस्तुभ पाध्ये, श्रीकांत कामत, राजेश लाटकर, भगरे गुरुजी, अस्मिता खटखटे, स्वाती पानसरे, सुषमा सीनलकर, बाल कलाकार, ओमकार जाधव, सानवी चव्हाण आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. वाचा-सोनाली पाटीलला बर्थडेला मिळालं खास सरप्राईज, क्यूट फॅनसोबतचा स्वीट Video Viral एम. जे. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या 'आय एम सॅारी' या चित्रपटाची निर्मिती अब्दुल मजीद चिकटे यांनी केली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि समाजसेवक असलेल्या अब्दुल मजीद चिकटे यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून कार्यकारी निर्माता रविंद्र जाधव यांनी देखील या सिनेमासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल एन्टरटेन्मेंटच्या सहयोगानं हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन दीपक भागवत यांनी केलं आहे.
  स्वातीच्या कामाबद्दल सांगायचे तर तिनं ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवाय हिंदी मालिका व जाहिरातीमध्ये देखील तिनं काम केले आहे. चाहत्ये तिला नवीन भूमिक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या