मुंबई, 16 फेब्रुवारी- 'माझी तुझी रेशीमगाठ'
(Mazi Tuzi reshimgath) ही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत चालली आहे. मालिकेतील गोड, निरागस परी आणि सोबतीला यश-नेहाची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच आवडली आहे. मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. आजही असंच काहीसं झालं आहे. मालिकेत नुकतंच एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री
(New Entry) झाली आहे. ही एक परदेशी अभिनेत्री आहे. ती नेमकी कोण आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
नुकतंच मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला होता. यामध्ये यशच्या एका जुन्या मैत्रिणीची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये नेहा यशला भेटण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये गेलेली असते. खरं तर नेहाने यशने पाडव्याला तिला गिफ्ट दिलेला ड्रेस परिधान केलेला असतो. तोच ड्रेस तिला यशला दाखवायचा असतो. परंतु कामाच्या गडबडीत यशला हे लक्षातच येत नाही. त्यामुळे नेहा नाराज होऊन केबिनच्या बाहेर निघून जाते. त्यावेळी समीर ही गोष्ट यशच्या लक्षात आणून देतो. नंतर यश नेहाला कॉम्प्लिमेंट द्यायला तिच्या जवळ जातो.
परंतु इतक्यात यशला मागून एक हाक हाक ऐकू येते. आणि एन्ट्री होते ती यशच्या एका परदेशी मैत्रिणीची जेसिका असं तिचं नाव आहे. हे पाहून नेहाला काही सुचेनासं होतं आता ही एन्ट्री झालेली अभिनेत्री नेमकी कोण आहे आणि ती मालिकेत कोणती भूमिका साकारणार याबद्दल थोडं जाणून घेऊया.
मालिकेत एन्ट्री झालेली अभिनेत्री-
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत एन्ट्री झालेली जेसिका ही कोण आहे? सर्वांनाच हा प्रश्न पडला असेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो जेसिका ही एक रशियन अभिनेत्री
(Russian Actress) आणि मॉडेल
(Model) आहे. तिने अनेक मालिका आणि जाहिरातीमध्ये काम केलं आहे. या अभिनेत्रीचं नाव जेन कटारिया असं आहे. या अभिनेत्रीने तमन्ना भाटियासोबत एका जाहिरातीतसुद्धा काम केलं आहे. जेनने तमन्नासोबतच एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती साडीमध्ये दिसून येत आहे. जेस आपल्या फिटनेससाठी खूपच सजग आहे. ती सतत जिममध्ये घाम गाळताना दिसून येते. तिच्या इन्स्टाग्रामवर जिममधील अनेक फोटो पाहायला मिळतात. आता ही अभिनेत्री मराठी मालिकेत कसं प्रेक्षकांचं प्रेम मिळते पाहणं महत्वाचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.