Home /News /entertainment /

तू आणि मी.. म्हणत प्रार्थना बेहेरेनं शेअर केला नवऱ्यासोबतचा रोमॅंटिक Video

तू आणि मी.. म्हणत प्रार्थना बेहेरेनं शेअर केला नवऱ्यासोबतचा रोमॅंटिक Video

प्रार्थना बेहेरेनं नुकताच नवऱ्यासोबतचा एक रोमॅंटिक व्हिडिओ रोमॅंटिक कॅप्शनसह शेअर केला आहे.

  मुंबई, 10 मे- अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. प्रार्थना तिचे काही फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ ( mazi tuzi reshimgath ) मालिकेत नेहा कामतची भूमिका साकारताना दिसत आहे. सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर आहे अशातच प्रार्थनानं मालिेकतून ब्रेक घेतल्याचे समोर आलं आहे. सध्या प्रार्थना बेहेरे नवऱ्यासोबत ( abhishek jawkar ) लंडन ट्रीपचा आनंद घेत आहे. तिनं नुकताच नवऱ्यासोबतचा एक रोमॅंटिक व्हिडिओ रोमॅंटिक कॅप्शनसह शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल ( prarthana behere abhishek jawkar romantic video)   होताना दिसत आहे. प्रार्थनानं नुकताच तिच्या नवऱ्यासोबतचा एक रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केला आहे. ती यामध्ये बसमध्ये ट्रॅव्हल करताना दिसत आहे. सोबत नवरा अभिषेक देखील आहे. मागे ब्रॅग्राऊडला एक आवाज येत आहे, कुछ लोगोंके साथ वक्त बितानेसे सभ सई हो जाता आहे..तिचा हा रोमॅंटिक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. वाचा-6 पॅक अ‍ॅब्स कमावले अर्जुनने पण कौतुक मात्र मलायकाचं! अभिनेत्याचे Photo Viral प्रार्थनाने या रोमॅंटिक व्हिडिओल मस्त अशी कॅप्शन देखील दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, तू आणि मी.. सध्या प्रार्थना नवऱ्यासोबत लंडनंमध्ये क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट बॉक्समध्ये रेड हार्ट इमोजीचा वर्षाव करत प्रेम व्यक्त केलं आहे.
  प्रार्थना बेहेरेचे अरेंज मॅरेज आहे. प्रार्थनाने आपल्या आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले आहे. एका मॅरेज ब्युरोच्या मदतीने प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर यांची ओळख झाली. त्यानंतर प्रार्थना आणि अभिषेक 14 नोव्हेंबर 2017 मध्ये विवाहबंधनात अडकले. गोव्यामध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. प्रार्थना आणि अभिषेक मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून देखील ओळखले जाते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या