Home /News /entertainment /

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत स्वामिनी फेम अभिनेत्रीची होणार एंट्री, पाहायला मिळणार नवा ट्वीस्ट!

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत स्वामिनी फेम अभिनेत्रीची होणार एंट्री, पाहायला मिळणार नवा ट्वीस्ट!

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका सध्या एका वळणावर आहे. आजोबांसाठी नेहानं परीचं सत्य लपवलं आहे. त्यामुळे यश तिच्यावर नाराज आहे. अशातच आता मालिकेत एक नवीन अभिनेत्री एंट्री करणार आहे.

  मुंबई, 5 एप्रिल- झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ (mazhi tuzi reshimgaath latest episode) मालिका सध्या एका वळणावर आहे. आजोबांसाठी नेहानं परीचं सत्य लपवलं आहे. त्यामुळे यश तिच्यावर नाराज आहे. अशातच आता मालिकेत एक नवीन अभिनेत्री एंट्री करणार आहे. स्वाभिमान फेम अभिनेत्री सानिका बनारसवाले (Sanika Banaraswale) मालिकेत एंट्री करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तिची नेमकी भूमिका काय असणार आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत सानिका बनारसवालेची एंट्री होणार आहे. सानिकाची नेमकी भूमिका काय असणार याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र सानिकाच्या येण्यानं मालिकेत आता कोणता नवीन ट्वीस्ट येणार याबद्दल मात्र सर्वांना उत्सुकता लागली आहे. सानिका यापूर्वी स्वाभिमान आणि स्वामिनी या मालिकेत दिसली होती. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. स्वामिनी मालिकेत साकारलेली सानिकाने जानकीबाई यांची भूमिका साकारली होती.नकळत सारे घडले या मालिकेत तिनं साकारलेली स्वातीची भूमिकाही गाजली होती. वाचा-परीचा आईच्या साडीवर 'ढोलिडा' वर डान्स, एक्स्प्रेशन्स पाहून आलियाला विसराल! नुकतचं सानिकाच लग्न झालं आहे. लग्नासाठी सानिकानं स्वाभिमान मालिका सोडल्याची चर्चा होती. आता पुन्हा ती माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. चाहते तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  सानिका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.ती तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सानिकाने पती ऋषभ कठारिया याच्यासोबत काही फोटो शेअर देखील सोशल मीडियावर शेअर करत असते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial, Zee marathi serial

  पुढील बातम्या