Home /News /entertainment /

'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये 'स्वाभिमान'मधील अभिनेत्रीची एंट्री, कुणाला करणार रिप्लेस?

'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये 'स्वाभिमान'मधील अभिनेत्रीची एंट्री, कुणाला करणार रिप्लेस?

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत स्वाभिमान आणि स्वामिनी फेम अभिनेत्री सानिका बनारसवाले जोशी (Sanika Banaraswale Joshi) दिसणार आहे

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत स्वाभिमान आणि स्वामिनी फेम अभिनेत्री सानिका बनारसवाले जोशी (Sanika Banaraswale Joshi) दिसणार आहे

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgath) मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. यश आणि नेहाची जोडी प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत रोज नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता या मालिकेत नवी एंट्री पाहायला मिळणार आहे

पुढे वाचा ...
  मुंबई, 05 एप्रिल: झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgath) मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. यश आणि नेहाची जोडी प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत रोज नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेचा मोठा चाहता वर्ग असून मालिकेत पुढे काय होणार याकडे, चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं. टीआरपीच्या रेसमध्ये ही मालिका काहीशी मागे पडत असली तरी टॉप 10 मध्ये आपलं स्थान टिकवून आहे. दरम्यान, आता या मालिकेत एका नवीन कलाकारची एंट्री (New Entry in Mazhi Tuzhi Reshimgath) होणार आहे. होय. या मालिकेत स्वाभिमान आणि स्वामिनी फेम अभिनेत्री सानिका बनारसवाले जोशी (Sanika Banaraswale Joshi) दिसणार आहे.मात्र तिची नेमकी भूमिका काय असणार आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. एका पोर्टलने याविषयी माहिती दिली आहे. 'माझी तुझी त्यामुळे अभिनेत्री सानिका जोशी मालिकेतील कोणाला रिप्लेस करणार आहे की, मालिकेत नव्या पात्राची एंट्री होणार आहे, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  मालिकेत जशी नवीन कलाकारांची एंट्री होत आहे, तसंच काही कलाकारांची एक्झिटदेखील पाहायला मिळाली आहे. या मालिकेत यशच्या आजोबांची भूमिका साकारणारे अभिनेते मोहन जोशी यांनी काही दिवसांपूर्वी या मालिकेतून एक्झिट घेतली होती. या मालिकेत अभिनेते मोहन जोशी यांनी जगन्नाथ चौधरी हे पात्र साकारलं होतं. त्यांनी साकारलेली यशच्या आजोबांची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. पण त्यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यशच्या आजोबांच्या भूमिकेत दिसू लागले आहेत. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या आवडीची पात्र आहेत. यातील 'परी' अर्थात मायरा वायकुळला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळते आहे. अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade Marathi Serial) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behre) यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. याशिवाय प्रदीप वेलणकर, मानसी मागीकर, अजित केळकर या दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. मालिकेतून कलाकार जाणं किंवा नवी पात्रं येणं ही फारशी नवी बाब नसली तरीही प्रेक्षकांवर आणि टीआरपीवर त्याचा परिणाम होतो हे मात्र नक्की. या बदलाचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या