मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mazhi Tuzhi Reshimgath: नेहासमोर आली यशची खरी ओळख; काय असणार दोघांच्या नात्याचं भविष्य

Mazhi Tuzhi Reshimgath: नेहासमोर आली यशची खरी ओळख; काय असणार दोघांच्या नात्याचं भविष्य

 'माझी तुझी रेशीमगाठ'   ( Mazhi Tuzhi Reshimgath )   ही मराठी मालिका अतिशय गाजत आहे. मालिकेतील श्रेयस   (Shreyas)  आणि प्रार्थनाची   (Prarthana)  जोडी आणि छोट्या परीचा निरागस अभिनय याची चर्चा घराघरात होत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 29 डिसेंबर-   'माझी तुझी रेशीमगाठ'   ( Mazhi Tuzhi Reshimgath )   ही मराठी मालिका अतिशय गाजत आहे. मालिकेतील श्रेयस   (Shreyas)  आणि प्रार्थनाची   (Prarthana)  जोडी आणि छोट्या परीचा निरागस अभिनय याची चर्चा घराघरात होत आहे. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. मालिकेच्या कथानकाच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे.सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि परांजपे याचं खरं रूप सगळ्यांसमोर येत आणि नेहाशी त्यांचं लग्न मोडतं. हे आपण सर्वांनीच पाहिलं. परंतु आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. यश आपली ओळख सांगण्याआधीच नेहाला सत्य समजणार आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्यात कोणतं नवं वादळ येणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सध्या झी मराठीवर 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका आपल्याला पाहायला मिळते. या मालिकेने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री लोकांना प्रचंड पसंत पडत आहे. तसेच परी आणि यशचं नातंही प्रेक्षकांना पाहायला आवडत आहे. सध्या मालिकेत फारच इंटरेस्टिंग भाग सुरु आहे. यशच्या मनात नेहा बद्दल प्रेम आहे या भावनेची जाणीव यशला तर झाली आहे. परंतु नेहासमोर ते प्रेम व्यक्त करण्याचं त्याचं धाडस होत नाहीय. यश अनेकदा आपली खरी ओळख नेहाला सांगण्याचा प्रयत्न करतो पण ते परंतु तसं होत नाही. महत्वाचं म्हणजे यश सांगण्याआधीच नेहाला त्याचं सत्य समजलं आहे. त्यामुळे तिला धक्का बसला आहे.

मालिकेत परांजपे यशचा बदल घेण्यासाठी, यशच्या आधीच नेहाला त्याची खरी ओळख सांगतो आणि नेहाला या गोष्टीचा धक्का बसतो. दुसरीकडे समीर यशला नेहासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आग्रह करतो. यश नेहाला सगळं खरं सांगण्याचं मनाशी पक्क करतो. परंतु त्याच्याआधीच नेहाला यशची खरी ओळख पटली आहे. त्यामुळे नेहा आता यशची बाजू ऐकून घेईल का? यश नेहासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करू शकेल का? नेहा आणि यशच मैत्रीचं नातं प्रेमात बदलेल कि तिथेच संपेल? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. या सर्व प्रश्नांचा उलघडा येत्या काही भागांमध्ये होणार आहे.

(हे वाचा:मन झालं बाजिंद'मध्ये नवा ट्वीस्ट, अखेर गुरुजींनी सांगितलेलं भाकीत खरं ठरलं!)

' माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रसिद्ध अभिनेता श्रेयश तळपदे यशची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहाची भूमिका साकारत आहे. गोड परीची भूमिका साकारणाऱ्या चिमुकलीचं नाव मायरा असं आहे. या मालिकेतून श्रेयश आणि प्रार्थनाने अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

First published:

Tags: Marathi entertainment, Zee marathi serial