मुंबई, 24 मार्च- 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath)मालिकेत सध्या यश आणि नेहाचा लव्ह ट्रॅक सुरू आहे. यशच्या आजोबांपासून नेहा आणि यशने परीचं नेहाची मुलगी असल्याने लपवून ठेवलं आहे. आता या सगळ्यात परीला देखील ( mazhi tuzhi reshimgath latest episode ) समजते तिच्यामुळे आजोबांना त्रास होतो. यामुळे ती घर सोडण्याचा निर्णय घेते व बॅग घेऊन घर सोडते. आता नेहा आणि यश परील शोधू शकतील का..यापुढं परीचं काय होणार याचा उलगाडा येणाऱ्या भागातच होणार आहे.
एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, आपल्यामुळे आजोबांना त्रास होत आहे, यामुळे परी घर सोडण्याचा निर्णय घेते. घर सोडण्यापूर्वी ती नेहाला फोन करते. यानंतर आजोबांना बाय करून ती घर सोडून निघून जाते. आता परीनं घर सोडलं आहे हे नेहाला समजल्यावर तिची अवस्था काय होणार. तसेच परी घर सोडून कुठे गेली असेल हा देखील प्रश्न आहे. नेहा आणि यश तिला सुखरूप घरी आणू शकतील का..याचा उलगडा येणाऱ्या भागात होईल.
be;e-TRP रेसमध्ये ही मालिका ठरली अव्वल! तर या मालिकेची झाली टॉप 10 मध्ये एन्ट्री
नेहा आणि यश दोघेही प्रेमात आहेत. दोघांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली आहे. परीनं देखील दोघांच्या लग्नाला परवानगी दिली आहे. मात्र यशच्या आजोबांसमोर यश आणि नेहाने परीचं नातं लपवलं आहे. परीचं सत्य समजल्यानंतर आजोबा दोघांच्या लग्नाल परवानगी देणार का, हा देखील प्रश्न आहे.
त्यामुळे परीचं भविष्यात काय होणार हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे यश आणि नेहानं प्रेमाची कबुली दिली असली तरी त्यांची रेशीमगाठ बांधताना अनेक अडचणीचा सामना करावा लागणार असेच दिसत आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.