Home /News /entertainment /

VIDEO : अखेर नेहाने यशसमोर दिली प्रेमाची कबुली, आता पुढे काय होणार?

VIDEO : अखेर नेहाने यशसमोर दिली प्रेमाची कबुली, आता पुढे काय होणार?

माझी तुझी रेशीमगाठ ( Mazhi Tuzhi Reshimgath )मालिकेत यशने नेहासमोर प्रेमाची कबुली दिलेली आहे. मात्र नेहा आजपर्यंत यशल टाळत आली आहे. आता मात्र तिनं यशसमोर प्रेमाची कबुली दिली आहे.

  मुंबई, 23 फेब्रुवारी- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ ( Mazhi Tuzhi Reshimgath ) सध्या वेगळ्या वळणावर आहे. यशने नेहासमोर प्रेमाची कबुली दिलेली आहे. मात्र नेहा आजपर्यंत यशल टाळत आली आहे. मालिकेत आत यशची गर्लफ्रेंड म्हणून जेसिकाची एंट्री झाली आहे. जेसिकाची आणि यशची जवळीकता पाहून नेहाला त्रास होत आहे. खरं तर समीर आणि यशने प्लॅन करून जेसिकाला यशच्या आयुष्यात आणलं आहे. मात्र हा प्लॅन आता यशस्वी होत आहे. कारण जेसिकामुळे का होईंना नेहाला यशच्या प्रेमाची जाणीव झाली आहे. लवकरच ती यशसोमर   ( neha confessed lov ) प्रेमाची कबुली ( Mazhi Tuzhi Reshimgath Latest Episode ) देणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी यश आणि नेहाला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक अतुर आहेत. आता तो दिवस आला आहे. अखेर यशला जेसिकासमोर पाहून नेहाने यशसमोर प्रेमाची कबुली दिली आहे. याचा नुकताच प्रोमो समोर आला आहे. जरी यशसमोर नेहाने प्रेमाची कबुली दिली असली तरी पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना दिली आहे. हा भाग येत्या 26 फेब्रुवारीला प्रसारित होणार असल्याची माहिती एका पोर्टलनं दिली आहे. वाचा-महेश मांजरेकरांची मुलगी सई 'या' प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला करतेय डेट या प्रोमोमध्ये दाखवण्याल आलं आहे की, यश जेसिकाला लग्नाची मागणी घालतांना दिसत आहे. मात्र, या दोघांना एकत्र पाहून नेहा धावत यशजवळ जाते आणि माझं तुझ्यावर प्रेम असल्याची कबुली देते. यश जे ऐकण्यासाठी अतुर होता ते आता त्याला मिळालं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  माझी तुझी रेशीमगाठमध्ये आता नेहाच्या आणि यशच्या नवीन प्रवासाला सुरूवात होणार आहे. असे जरी असलं तरी यशच्या आजोंबाना जेव्हा नेहाचं सत्य समजेल तेव्हा ते लग्नाल परवानगी देणार का, असा देखील प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. तसेच सिम्मी या दोघांच्या प्रेमात कोणता नवीन खोडा घालणार नाही ना याची देखील चिंता चाहत्यांना सतावत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या