Home /News /entertainment /

Video : 'माझी तुझी रेशीमगाठ 'मध्ये अशी साजरी झाली पडद्यामागे होळी, नेहाने सांगितला कॅमेऱ्यामागचा किस्सा

Video : 'माझी तुझी रेशीमगाठ 'मध्ये अशी साजरी झाली पडद्यामागे होळी, नेहाने सांगितला कॅमेऱ्यामागचा किस्सा

नुकताच माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत होळीचा (Mazhi Tuzhi Reshimgath Holi Episode ) सीन शूट झाला. हा सीन कसा शूट झाला याचा पडद्यामागचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

  मुंबई, 16 मार्च- झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgath Upcoming Episode) मालिका कमी काळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास यशस्वी झाली आहे. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी सर्वांची आवडती जोडी आहे. शिवाय छोटी परी देखील तिच्या निरागस अभिनयामुळे प्रेक्षकांचे मन जिंकते. सध्या मालिकेत नेहा ( prarthana behere) आणि यशचा लव्हट्रॅक सुरू आहे. अशातच रंगाची उधळण करायणारा होळीचा सण तोंडावर आला आहे. नुकताच माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत होळीचा (Mazhi Tuzhi Reshimgath Holi Episode ) सीन शूट झाला. हा सीन कसा शूट झाला याचा पडद्यामागचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यश आणि नेहाच्या फॅन पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नेहा म्हणजे प्रार्थना बेहेरे सांगताना दिसत आहे की, यंदाची होळी तिच्यासाठी स्पेशल आहे. शिवाय खास करून नेहासाठी कारण या होळीच्या भागात नवीन काय तरी ट्वीस्ट असल्याचा सांगितलं आहे. नेहाच्या आय़ुष्यात काही तरी छान घडणार असल्याची तिनं हिंट यावेळी दिली.
  सेटवर सगळे तयार होताना दिसत आहेत. प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे( shreyas talpade ) तसेच संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade ) देखील होळीच्या भागासाठी तयार होताना दिसत आहेत. शिवाय छोटी परी देखील सेटवर दिसत आहे. ती होलिका देवीची नेहासोबत पूजा करताना दिसत आहे. बॅक स्टेजला देखील सर्वजण होळीच्या सणाचा आनंद घेताना दिसत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या