Home /News /entertainment /

'Mazhi Tuzhi Reshimgaath' फेम शेफालीचे Mumbai Indians संघासोबतचे PHOTO व्हायरल; काय आहे कनेक्शन?

'Mazhi Tuzhi Reshimgaath' फेम शेफालीचे Mumbai Indians संघासोबतचे PHOTO व्हायरल; काय आहे कनेक्शन?

झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgaath) ही मालिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. यातली नायिका नेहा म्हणजे प्रार्थना बेहेरेची जवळची मैत्रीण शेफालीचं IPL च्या Mumbai Indians शी काय आहे कनेक्शन?

पुढे वाचा ...
  मुंबई, 23 सप्टेंबर 2021 ; झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgaath) ही मालिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. त्याच कारण म्हणजे मालिकेतील नेहा म्हणजेच प्रार्थना बेहरेची (Prarthana Behere in TV serial) सहकारी आणि जवळची मैत्रीण शेफाली ही आहे. शेफालीचे क्रिकेटशी खास कनेक्शन असल्याची चर्चा मराठी सिनेसृष्टीत रंगली आहे. शेफालीची भूमिका अभिनेत्री काजल काटे (kajal kate)  साकारत आहे. तिने काही दिवसापूर्वी आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians ) संघातील खेळाडू हार्दिक पांड्यासोबत काही फोटो शेअर केले होते. सोशल मीडियावर शेफालीचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांना हिचं आणि मुंबई इंडियन्सचं काय कनेक्शन आहे ? असा प्रश्न पडला आहे. तर शेफालीचे मुंबई इंडियन्सशी काय आहे कनेक्शन? शेफाली म्हणजेच काजल काटे हिचा नवरा प्रतिक कदम मुंबई इंडियन्स संघामध्ये प्रशिक्षक म्हणून काम पाहातो आहे. त्यामुळे शेफाली आणि मुंबई इंडियन्सचे खूप जवळचे नाते आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. काजलने नवरा प्रतिकसोबतचे सामन्या दरम्यानचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. हेच फोटो व्हायरल होत आहेत. वाचा : निर्मिती सावंत थुकरटवाडीत! रिहर्सलचा Reel VIDEO पाहिला का? हसता हसता होईल पुरेवाट झी मराठी वाहिनीवर नुकतीच 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका दाखल झाली आणि या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. या दोघांव्यतिरिक्त चिमुकल्या परीची घराघरात चर्चा होताना दिसते आहे.तसेच या मालिकेतील नेहाची सहकारी आणि जवळची मैत्रीण शेफाली या पात्रानेदेखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
  या भूमिकेबद्दल काजल सांगते की, 'शेफाली अगदी माझ्यासारखीच आहे. आनंदी, सगळ्यांना हसवत असणारी, काहीशी अल्लड अशीच मीदेखील आहे. त्यामुळे शेफाली माझ्या फार जवळची आहे. शेफाली म्हटले की माझ्या डोळ्यांसमोर 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील काजोल आणि 'जब वी मेट'मधली करीना. या दोघींचे मिश्रण म्हणजे शेफाली आहे.' असे वाटत असल्याचे काजलने म्हटले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Marathi entertainment, Mumbai Indians, Zee Marathi

  पुढील बातम्या