Home /News /entertainment /

Mazhi Tuzhi Reshimgaath : नेहा यशला माफ करणार पण या व्यक्तीमुळे त्यांच्यात येणारा दुरावा

Mazhi Tuzhi Reshimgaath : नेहा यशला माफ करणार पण या व्यक्तीमुळे त्यांच्यात येणारा दुरावा

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहा यशला माफ करणार आहे. मात्र असे असले तरी एका व्यक्तीमुळे हे दोघे वेगळं होणार आहेत.

  मुंबई, 26 जानेवारी- झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ( mazhi tuzhi reshimgaath ) मालिक एका वेगळ्या वळणावर आहे. सध्या मालिकेत यश नेहाला ( yash and neha ) मनवाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नेहा मात्र तिचा अबोला सोडायला तयार नाही. तिच्या वागण्यावरून तर असच दिसत आहे की ती काय सहजासहजी यशला माफ करणार नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार नेहा यशला माफ करणार आहे.यामुळे या दोघांच्यातील अंतर मिटणार आहे. एका पोर्टलने याबद्दल माहिती देत म्हटलं आहे की, लवकरच नेहा यशला माफ करणार आहे. यामुळे या दोघांच्याचील अंतर मिटणार आहे. मात्र या दोघांना जास्त काळ एकत्र पाहता येणार नाही. कारण सिम्मी या दोघांना वेगळं करणार आहे. चाहत्यांनी मात्र या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्साही असल्याचे म्हटलं आहे. वाचा-'माझ्यासाठी कधी लढली तर...'; आई कुठे काय करते फेम संजनाची खास पोस्ट मात्र हा आनंद किती काळ टिकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शिवाय यशला माफ केल्यानंतर नेहा त्याच्या प्रेमाला स्वीकार करणार का हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या नवीन ट्वीस्टचा मालिकेच्या येणाऱ्या भागातच उलगडा होईल. यासाठी प्रेक्षकांना काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ( mazhi tuzhi reshimgaath ) मालिका अल्पावधित प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील यश आणि नेहीची ( yash and neha ) जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. यशची भूमिका श्रेयस तळपदेने साकारली आहे. तर नेहाची भूमिका प्रार्थना बेहेरेने साकारली आहे. याशिवाय या मालिकेतील छोट्या परीची भूमिका देखील प्रेक्षकांची आवडती भूमिका आहे. याशिवाय सिम्मीची भूमिका मालिकेत नकारात्मक शेडची असली तरी प्रेक्षकांना सिम्मीची स्टाईल खूप आवडते. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.  तगड्या स्टारकास्टमुळे मालिका सतत चर्चेत देखील असते. मालिकेत एकपेक्षा एक सरस कलाकार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या