Home /News /entertainment /

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अनिता दातेनं किरण माने प्रकरणावर दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अनिता दातेनं किरण माने प्रकरणावर दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

'माझ्या नवऱ्याची बायको' (Maza Navryachi Bayko) फेम अभिनेत्री अनिता दातेनेसुद्धा (Anita Date) या गोष्टीचा निषेध करत किरण माने यांना पाठिंबा दिला आहे.

    मुंबई, 16 जानेवारी-   सध्या किरण माने    (Kiran Mane)    यांचा मुद्दा चर्चेत आहे. राजकीय भूमिका घेतल्यामुळे त्यांना 'मुलगी झाली हो' (Mulagi Zali Ho)   मालिकेमधून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं आहे. या गोष्टीचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको'  (Maza Navryachi Bayko)   फेम अभिनेत्री अनिता दातेनेसुद्धा   (Anita Date)  या गोष्टीचा निषेध करत किरण माने यांना पाठिंबा दिला आहे. नुकताच 'मुलगी झाली हो' या मालिकेचं नवीन पोस्टर समोर आलं आहे. त्यामधून किरण माने यांना वगळण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता कलाकार पुढे येऊन किरण मानेंना समर्थन देत आहेत. 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री अनिता दातेनं याबद्दल बोलताना म्हटलं आहे, 'कोणत्याही अभिनेत्याला, अभिनेत्रीला कोणतीही पूर्व कल्पना न देता, कोणतंही योग्य कारण न देता, समज न देता कामावरून काढून टाकणे हे साफ चुकीचं आहे. तसेच अशा संस्था आणि वाहिनीने त्या कलाकारांना कामावरून काढून टाकण्यासाठी योग्य कारण सांगण्याचे सौजन्य दाखविले पाहिजे'. अनिता दाते पुढे बोलताना म्हणाली, 'आपली व्यवस्था समजून घेणं, व्यवस्थेला प्रश्न विचारानं, आपली राजकीय भूमिका योग्य पद्धतीनं मांडता येणं हे खरं तर चांगलंच आहे असं मला वाटतं. याबद्दल मला किरण मानेनंच कौतुक वाटत. परंतु एखाद्या व्यक्तीची पोस्ट समजून न घेता त्याला चुकीचं ठरवून त्याची गळचेपी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. एखाद्या व्यक्तीची राजकीय भूमिका वेगळी असू शकते, असं असल्यास आपण त्यावर वाद घालू शकतो. चर्चा करू शकतो. विचारांची देवाणघेवाण करू शकतो. परंतु असं न करता एखाद्या व्यक्तीच तोंडच बंद करणं किंवा तिच्या कामावर गदा आणणं  हे एक माणूस म्हणून आणि समाज म्हणून आपण निर्बुद्ध आणि मागास असल्याचं लक्षण आहे'.याबद्दलच वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रकशित केलं आहे. (हे वाचा:'मुलगी झाली हो' चं नवीन पोस्टर आलं समोर, पोस्टरमधून किरण मानेंना वगळलं) डॉ. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया- डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपली एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील एक फोटो आणि एक राजकीय क्षेत्रातील फोटो शेअर केला आहे. हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये विचारलं आहे, 'राजकीय भूमिकेमुळे मालिकेतून काढून टाकलं जातं का?' यावरून हेच स्पष्ट होतं त्यांनी किरण मानेंना आपला पाठिंबा दिला आहे.डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत काय म्हटलं आहे. यामध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे, 'मला हा विषय महत्वाचा वाटतो. अशा पद्धतीनं खरंच होतं का? समाजमाध्यमांवर राजकीय भूमिका घेतल्यास कलाकरांना मालिकांमधून काढलं जातं का? हे मला सांगायचं आहे. जी गोष्ट मला पटत नाही त्याबद्दल मी सातत्यानं सांगत आलो आहे. मात्र मला अशा प्रकराचा अनुभव कधीच आलेला नाही'.ते पुढं म्हणाले, 'मी देखील एका वाहिनीसाठी मालिका करत होतो. त्यात कधीही आडकाठी कुणीही केली नाही. वेगवेगळ्या वाहिन्यांवर मी काम केलं, कोणत्याही वाहिनींकडून मला अशा प्रकारचं वर्तन केलं जात नाही. असं मला तरी दिसून आलेलं नाही. असं म्हणत डॉ. अमोल कोल्हे यांनी आपलं मत मांडलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Marathi actress, Marathi entertainment

    पुढील बातम्या