बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी रसिकाची घाई; मजेशीर VIDEO होतोय VIRAL

बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी रसिकाची घाई; मजेशीर VIDEO होतोय VIRAL

'माझ्या नवऱ्याची बायको’(Maza Navryachi Bayako) मालिकेतील शनाया या व्यक्तीरेखेमुळे रसिका लोकप्रिय झाली होती.

  • Share this:

मुंबई, 21 जून- ‘माझ्या नवऱ्याची बायको’(Maza Navryachi Bayako)  मालिकेत राधिकाच्या संसारात ढवळाढवळ करणारी शनाया (Shanaya)  आपल्या सर्वांनाचं परिचयाची आहे. शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील(Rasika Sunil)  नेहमीचं आपल्या बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. कधी ती आपल्या बोल्ड लुकमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेते, तर कधी आपल्या बॉयफ्रेंडवरील प्रेमामुळे चर्चेत येते. सध्या रसिकाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. त्यामध्ये ती आपल्या बॉयफ्रेंडला घेण्यासाठी एयरपोर्टवर आली आहे. मात्र तो जवळ येईपर्यंत तिला धीर नाहीय. रसिका इतकी त्याला भेटण्यासाठी उत्सुक झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

अभिनेत्री रसिका सुनीलने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती एयरपोर्ट असलेली दिसून येत आहे. ती आपला बॉयफ्रेंड आदित्य बिलागीला घेण्यासाठी येथे आली आहे. मात्र आदित्य तिच्या जवळ येईपर्यंत तिला मूळीचं दम निघत नाही. ती जागेवर उड्या मारू लागते. आणि आदित्य जवळ येताच त्याला एक घट्ट मिठी मारते. सध्या रसिकाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतं आहे.

(हे वाचा: बहुप्रतीक्षित 'समांतर 2' चा ट्रेलर अखेर प्रदर्शित; पुन्हा येणार थरारक अनुभव  )

रसिकाने काही महिन्यांपूर्वी आपण आदित्य बिलागीसोबत नात्यात असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासूनचं सोशल मीडियावर या जोडीची विशेष चर्चा असते. आदित्यने व्हेलेंटाईन डेला खास अंदाजात रसिकाला प्रपोजदेखील केलं होतं. त्यांनतर एक सुंदर हेलिकॉप्टर राईडसुद्धा केली होती. यामुळे ते दोघे खुपचं चर्चेत आले होते. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियार प्रचंड व्हायरल झाले होते. आणि चाहत्यांकडून ते पसंतदेखील करण्यात आले होते. रसिकाने सांगितल्यानुसार आदित्य लॉस एंजेलिसमध्ये राहतो. तो एक इंजिनियर आहे. तसेच तो एक डान्सर आणि कोरियोग्राफरदेखील आहे. सोशल मीडियावर या गोड जोडीला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.

Published by: Aiman Desai
First published: June 21, 2021, 4:17 PM IST

ताज्या बातम्या