• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO : Maza Hoshil Na मालिकेतील आदित्यचं हे दिवाळी स्पेशल फनी फिल्टर पाहिलं का?

VIDEO : Maza Hoshil Na मालिकेतील आदित्यचं हे दिवाळी स्पेशल फनी फिल्टर पाहिलं का?

विराजस कुलकर्णी ( virajas kulkarni) ने दिवाळीनिमित्त खास इन्स्टा फिल्टर शेअर केले आहे. सोशल मीडियावर त्याच्या हे इन्स्टा फीलटर जोरदार व्हायरल होत आहेत.

 • Share this:
  मुंबई 2 नोव्हेंबर : माझा होशील ना (Maza Hoshil Na )या मालिकेतून विराजस कुलकर्णी ( virajas kulkarni) महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. मालिकेत त्याने साकारलेला आदित्य प्रेक्षकांना विशेष भावला होता. आजोबा जयराम कुलकर्णी आणि आई मृणाल कुलकर्णी यांच्या अभिनयाचा वारसा विराजस पुढे चालवत असला तरी त्याच्याकडे मल्टीटॅलेंटेड व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते. नुकताच त्याने दिवाळीनिमित्त खास इन्स्टा फिल्टर शेअर केले आहे. सोशल मीडियावर त्याच्या हे इन्स्टा फिल्टर जोरदार व्हायरल होत आहेत. विराजने सोशल मीडियावर दिवाळीनिमित्त एक मजेदार फिल्टर शेअर केले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील हा व्हिडीओ भलताच अवडलेला आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर अनेक कलाकर इन्स्टा रील असतील किंवा फिलटर शेअर करत असतात. अनेक कलाकारांनी दिवाळीनिमित्त इन्स्टा रील करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
  विराजसने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे, असा एक फराळाचा फिल्टर ही बनला पाहिजे, नाही का?दिवाळी मध्ये खूप खा, नंतर खूप व्यायाम करा! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏... वाचा : बिग बॉस मराठीमध्ये टीम्स करतायेत प्लॅनिंग...; कोणाचा होणार ''डब्बा गुल'' विराजस कुलकर्णीने व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल मधून फिल्म मेकिंगचे धडे गिरवले आहेत. यासोबतच उषा गांधी मॅनेजमेंटमधून त्याने जाहिरात क्षेत्रात बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी मिळवली आहे. कॉलेजमध्ये असताना अनेक नाट्यस्पर्धां त्याने आपल्या अभिनयाने गाजवल्या आहेत. यातील काही नाटकांच्या दिग्दर्शन आणि लेखनाची जबादारी देखील त्याने सांभाळली होती. वाचा : 'मन उडू उडू झालं' मालिकेतील इंद्रा आणि दिपूने घेतली राज ठाकरेंची भेट वेबसिरीज असो वा नाटक अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्याने अभिनयासोबतच लेखन आणि दिग्दर्शन अशा भूमिका बजावल्या आहेत. विराजसला सर्वजण उत्तम अभिनेता म्हणून आपण ओळखतोच मात्र त्याने रमा माधव याच चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी त्याने सांभाळली होती. या चित्रपटची दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केलं होतं.
  Published by:News18 Trending Desk
  First published: