Home /News /entertainment /

VIDEO: 'हम दिल दे चुके सनम'; पाहा गौतमी देशपांडेचा सुरेल अंदाज

VIDEO: 'हम दिल दे चुके सनम'; पाहा गौतमी देशपांडेचा सुरेल अंदाज

‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na) फेम सई (Sai) अर्थातच गौतमी देशपांडेने(Gautami Deshpande) आपल्या आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे.

  मुंबई, 20 मे- ‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na)  फेम सई (Sai) अर्थातच गौतमी देशपांडेने(Gautami Deshpande) आपल्या आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे. नुकताच सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ (Instagram Video) शेयर केला आहे. त्यामध्ये ती ‘हम दिल दे चुके सनम’ गाणं म्हणताना दिसत आहे. सईने खुपचं सुंदर गाणं म्हटलं आहे. मात्र सईची गाणं म्हणण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. सई सतत फावल्या वेळेत आपल्या गाण्याचे व्हिडीओ शेयर करत असते. झी मराठीतील ‘माझा होशील ना’ या मालिकेत गौतमी सध्या काम करत आहे. या मालिकेमुळे गौतमीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तसेच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केल आहे. यातील सई आणि आदित्यची लव्हस्टोरी लोकांना चांगलीच पसंत पडते.
  सई म्हणजेच गौतमी सतत आपल्या सोशल मीडियावर आपले व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते. ती बऱ्याच वेळा गाणं म्हणताना दिसते. तिला अभिनया सोबतचं गाण्याचीसुद्धा प्रचंड आवड आहे. फक्त तिच नव्हे तर तिची मोठी बहिण आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सुद्धा तिच्यासोबत गाणं म्हणते. (हे वाचा: बाबांच्या कुशीत विसावलेल्या या चिमुकलीला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री ) नुकताच गौतमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती अतिशय गोड आवजात ‘हम दिल दे चुके सनम’ हे गाणं म्हणताना दिसत आहे.  नेहमीप्रमाणेच चाहत्यांना गौतमीचं हे गाणं खुपचं पसंत पडलं आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. (हे वाचा:VIDEO: पाणी कधी, केव्हा आणि कसं प्यावं? पाहा प्राजक्ता माळीनं दिलेल्या खास टीप्स  ) गौतमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. ती सतत आपल्या छोट्या छोट्या गोष्टी चाहत्यांसोबत शेयर करत असते. गौतमीचं मृण्मयीशी खुपचं चांगलं नातं आहे. या दोघी बहिणी कमी आणि मैत्रिणी जास्त आहेत. सतत त्या एकमेकांबद्दल आपलं प्रेम व्यक्त करत असतात. तर बऱ्याच वेळा त्या दोघी मोकळ्या वेळेत गाण्याचं रियाज करताना दिसून येतात.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Instagram post, Marathi entertainment

  पुढील बातम्या