मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

गौतमीने शेयर केलं डेली मेकअप रुटीन; VIDEO पाहून तुम्हालाही होईल मदत

गौतमीने शेयर केलं डेली मेकअप रुटीन; VIDEO पाहून तुम्हालाही होईल मदत

गौतमी सध्या ‘माझा होशील ना’ मालिकेत काम करत आहे

गौतमी सध्या ‘माझा होशील ना’ मालिकेत काम करत आहे

गौतमी सध्या ‘माझा होशील ना’ मालिकेत काम करत आहे

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 3 जुलै-  ‘माझा होशील ना’(Maza Hoshil Na) मालिकेतील सई (Sai) अर्थातच अभिनेत्री गौतमी देशपांडे(Gautami Deshpande) सर्वांचीच लाडकी बनली आहे. या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. सोशल मीडियावरसुद्धा तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावरसुद्धा खुपचं सक्रीय असते. सतत आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट करत असते. नुकताच गौतमीने आपला डेली मेकअपचा व्हिडीओ (Daily Makeup Routine) चाहत्यांसाठी शेयर केला आहे.

अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती सतत फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करत असते. मात्र आज गौतमीने एक खास व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ मुलींना तर नक्कीचं पसंत पडणार. कारण गौतमीने या व्हिडीओतून आपलं डेली मेकअप रुटीन शेयर केलं आहे. आत्ता मेकअप म्हणजे मुलींच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेक मुलींना मेकअप करण किंवा मेकअप शिकून घेणं खुपचं आवडतं. ते सतत वेगवेगळ्या साईडसवर मेकअप व्हिडीओ सर्च करत असतात.

बहुतांश मुलींना अभिनेत्रींसारखा मेकअप करण्याकडे कल असतो. त्यामुळे गौतमीने शेयर केलेल्या या व्हिडीओमुळे तुम्हाला नक्कीचं मदत होणार आहे. प्रत्येक वोकेजनसाठी निराळा मेकअप करण्यात येतो. दररोजसाठी अनेकजण लाईट मेकअप ठेवणं पसंत करतात. त्यामुळेचं गौतमीचा हा व्हिडीओ तुम्हाला खुपचं उपयोगी पडणार आहे.

(हे वाचा:'मिसेस मुख्यमंत्री' फेम सुमीने वेधलं सर्वांचं लक्ष; लाल साडीत दिसतेय खुपचं सुंदर  )

या व्हिडीओमध्ये गौतमीने टोनर वापरण्यापासून ते लीपबाम आणि लिपस्टिक पर्यंत सगळ्याच गोष्टी शेयर केल्या आहेत. तसेच गौतमीनं म्हटलं आहे, ‘मलासुद्धा डेली फारसा मेकअप करायला आवडत नाही. त्यामुळे मीसुद्धा डेली खुपचं बेसिक मेकअपला प्राधान्य देते.

(हे वाचा: Darlings: आलिया भट्ट झाली निर्माती; शुटींगच्या पाहिल्याचं दिवशी दिसली नर्व्हस)

गौतमी सध्या ‘माझा होशील ना’ मालिकेत काम करत आहे. तिच्या सहजसुंदर अभिनयानं दर्शकांचं मन जिंकलं आहे. ही मालिका अल्पावधीतचं मोठी लोकप्रिय झाली होती. आजही मालिकेची तशीच लोकप्रियता कायम आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment