विराजस कुलकर्णी सोशल मीडियावरसुद्धा बराच सक्रीय असतो. तो नेहमीचं चाहत्यांसाठी नवनवीन गोष्टी शेयर करत असतो. तो आपल्या विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. नुकताच विराजसने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये त्याच्या हातात बंदूक दिसून येत आहे, शिवाय त्याचा शर्टसुद्धा रक्ताने माखला आहे. त्यामुळे चाहते खुपचं आश्चर्य चकित झाले आहेत. मात्र हा एक मजेशीर व्हिडीओ आहे. विराजसने त्या व्हिडीओला कॅप्शन देत ‘ऑडीशन फॉर गँगस्टर फिल्म’ असं म्हटल आहे. हा एक इन्स्टाग्राम रील आहे. (हे वाचा:VIDEO: शर्वरीने दिली गुड न्यूज!, 'शुभमंगल ऑनलाईन' मध्ये आनंदाचं वातावरण) तसेच काही युजर्सनी मजेशीर कमेंट्ससुद्धा केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे, तू काही जरी केलंस तरी गोडचं दिसतोस, तर दुसऱ्या युजर्सने म्हटलं आहे, ‘तू इतका गोड आहेस की तू गँगस्टर वाटतचं नाही. तर एकाने चक्क असंही म्हटलं आहे,’ इतकचं येतं तर मग सारख फटके का खात असतोस’. तर अनेक युजर्सनी म्हटलं आहे. (हे वाचा: VIDEO: 'खतरों के खिलाडी' मध्ये फुललं नवं नातं; वाचा 'त्या' जोडीबद्दल) सध्या ‘माझा होशील ना’ मालिकेत आदित्य आणि सई अनेक संकटांना तोंड देत आहेत. आधी त्यांना त्रास द्यायला सिंधू मामी होतीच. आत्ता त्यातच भर म्हणून जेडीची एन्ट्री झाली आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्वीस्टने चाहते उत्सुक झाले आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment