मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

EXCLUSIVE: 'सई' इतकी लोकप्रिय होऊनही गौतमी का म्हणते 'अभिनयच करत राहीन असं नाही'

EXCLUSIVE: 'सई' इतकी लोकप्रिय होऊनही गौतमी का म्हणते 'अभिनयच करत राहीन असं नाही'

सई म्हणजेच गौतमी देशपांडे सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. 'मी सईसारखीच खरी आहे', असं सांगणारी गौतमी उलगडतेय तिच्या आयुष्यातल्या गमती..

सई म्हणजेच गौतमी देशपांडे सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. 'मी सईसारखीच खरी आहे', असं सांगणारी गौतमी उलगडतेय तिच्या आयुष्यातल्या गमती..

सई म्हणजेच गौतमी देशपांडे सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. 'मी सईसारखीच खरी आहे', असं सांगणारी गौतमी उलगडतेय तिच्या आयुष्यातल्या गमती..

सोनाली देशपांडे

सध्या ‘माझा होशील ना’ मालिकेत (Maza hoshi na Marathi serial) बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्यातली सई चांगलीच लोकप्रिय होत आहे. सई म्हणजेच गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) सोशल मीडियावरही नेहमी अॅक्टिव असते. मूळची इंजिनियर असलेली गौतमी सुरेल गाते. तिच्याबरोबर गप्पा म्हणजे सुरेख ट्रीटच.

हरहुन्नरी गौतमी सई व्यक्तिरेखेकडे कसं बघते ? ‘मला सईचा बिनधास्तपणा आवडतो.’ गौतमी हसून सांगते. ‘कारण सई खूप खरी आहे. आपण म्हणतो ना, काही गोष्टी पोटातून वाटल्या की कराव्यात. ती तसं करते. मला हे आवडतं. तिचा इनोसन्स मला आवडतो. खूप कमी व्यक्तिरेखांमध्ये हा सलग इनोसन्स जपता येतो. इनोसन्स म्हणजे क्युट क्युट असणं नव्हे, तर खरं असणं. तुम्ही जे काही करता ते खरेपणानं करणं. सईतले हे गुण मला खूपच आवडतात.’

मग गौतमीला सईमधलं काही खटकत नसेलच, असं वाटत असेल, तर तसं नाही. ती सांगते, ‘ सई पटकन विचार न करता एखादा निर्णय घेऊन टाकते. त्याचे परिणाम काय हे न बघता, ती मनाला वाटेल ते करून टाकते. त्यामुळे तिच्या अंगाशीही आलंय अनेकदा. पुढेही येणार आहे. या गोष्टी मला खटकतात.’

सई आणि गौतमीत किती साम्य आहे? गौतमी सांगते, 'अनेक गोष्टीत मी आणि सई सारख्या आहोत. महत्त्वाचं म्हणजे सईचा खरेपणा माझ्यात आहे. मी खोटी नाही आणि मला खोटेपणा करणारी माणसं आवडत नाहीत.’  ‘म्हणजे मला कोणाला रागाने किंवा प्रेमाने डुक्कर म्हणायचं असेल, तर मी ते म्हणते. पण मी साॅरीही लगेच म्हणते. साॅरी आणि थँक्स असे दोन शब्द आहेत, ज्याने आपलं आयुष्य सोपं होतं.’

EXCLUSIVE: अनेक मालिका नाकारून 8 वर्षांनी का निवडली उमेशने ‘ बरसात’?

 गौतमीचा नायक आदित्य म्हणजेच विराजस कुलकर्णी तिचा चांगला मित्रही आहे. त्याच्याबद्दल बोलताना ती सांगते, ‘तो खूप नॉलेजेबल आहे. सिनेमा, नाटकांबद्दल त्याचं ज्ञान खूप आहे. तो वाचन करतो. अनेक बाबतीत हेल्पफुल आहे. आमच्या वाचनाच्या आवडीनिवडी जुळतात.’ पण तो सेटवर असताना सारखा मोबाईलमध्ये असतो, हे तिला खटकतं.

हे ही वाचा: VIDEO: 'चुरा लिया है तुमने...' अभिनेत्री रिंकू राजगुरू पडली प्रेमात?

गौतमीचं गाणं ऐकलं की वाटतं, हिने यात करियर करावं. गाणं की अभिनय, काय ठरवलंय गौतमीनं? ‘मी असं काहीच ठरवलं नाहीय अजून. मी आधी खरं तर गायचेच. मी पुण्यात शो करत होते. शिवाय मी नोकरीही करत होते. त्यामुळे मी असं नाही म्हणत की एखादी गोष्ट करियर असते, एखादी छंद. असं काही नसतं. आपण सगळंच करत असतो.’ गौतमी निसर्गात रमते. पुढे जाऊन एखादं सुंदर रिसाॅर्ट बांधण्याचाही तिचा विचार आहे. ती पुढे सांगते, ‘ मी आता अभिनय करते म्हणून अभिनेत्रीच राहीन असं नाही. कदाचित दिग्दर्शन करेन किंवा एखाद्या रिसाॅर्टवर मी शांत बसलेली दिसेन. कदाचित गायिका म्हणून पुढे येईन. आपलं एकच आयुष्य असतं. त्यात देवाने तुम्हाला जे जे दिलंय, याचा पुरेपूर उपयोग करून घेणं, त्यात आनंद घेणं माझ्यासाठी करिअर करण्यापेक्षा महत्त्वाचं आहे.’

मृण्मयी आणि गौतमीचे बहिणी म्हणून सुंदर बंध सगळ्यांनाच नेहमी जाणवत असतात. मृण्मयी किती ताईगिरी करते गौतमीवर? ‘ती मला नेहमीच गाईड करत असते. म्हणजे एखाद्या सीनचं ती कौतुकही करते आणि तो वाईट झाला, तर टीकाही तेवढीच करते. आम्ही एकमेकींशी भांडतोही जबरदस्त आणि तेवढ्याच एकत्रही येतो. तीही माझ्याप्रमाणेच खरी आहे,’ गौतमी हसून सांगते. दोघींचं नातं छान फुलत गेल्याचं गौतमी सांगते. ती पुढे म्हणते, आम्हाला घरातच एकमेकीत बेस्ट फ्रेंड मिळालेत. त्यामुळे आम्हाला बाहेर जावं लागलंच नाही.

हे ही वाचा: विनोदवीराची प्रेमकथा डोळ्यात पाणी आणेल; कुशल बद्रिकेला प्रेयसी द्यायची 50 रुपये

गौतमी नियमित पुणे-मुंबई प्रवास करते. एकदा तिचा अपघात होता होता थोडक्यात ती वाचली होती. ती स्वत: ड्राइव्ह करत पुण्याहून मुंबईला येते. ‘असे अनुभव येत असतातच. पण त्यातून शिकत मी ड्राइव्हिंग एंजाॅय करते,’ ती म्हणते.

गौतमी नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव असते. पण त्याच्या वापराबद्दल तिची अशी मतं आहेत. ती म्हणते, ‘सोशल मीडियावर कुणी काय टाकावं, कुणी किती पर्सनल लिहावं, हा त्या व्यक्तीचा प्रश्न असतो.’ पण ट्रोलिंग करणाऱ्यांवर मात्र तिचा आक्षेप आहे. ‘ कुणाचा घटस्फोट होतो, त्यावेळी ट्रोल करायचं, कुणाच्या मृत्यूसमयी कोणी काय कपडे घातले आहेत, त्यावर ट्रोलिंग. हे चुकीचे आहे. तुम्हाला माहीत नसतं, कोण कुठल्या मानसिक स्थितीतून जात आहे.’ गौतमी सांगते, या सगळ्याला घाबरून तिच्या एका मैत्रिणीने सोशल मीडिया सोडला. ‘काही संवेदनशील गोष्टी आहेत, त्याचं ट्रोलिंग किंवा त्याच्या मिम्स करू नयेत. आपणही संवेदनशील वागावं.’ ती सांगते.

गौतमीला पाऊस खूप आवडतो. ती म्हणते, ‘गेल्या जन्मी मी मोर असेन. कारण पाऊस आला की माझा मूडच चांगला होतो. पाऊस सुरू असताना मस्त गाणी ऐकणं, खिडकी उघडी ठेवून पाऊस पाहणं, काॅफीबरोबर मॅगी किंवा भजी खाणं हे मी करते. मी पावसासारखी आहे. मला पाऊस प्रचंड आवडतो. मी बराच वेळ खिडकीतून पाऊस बघत बसते. पाऊस माझा सोबती आहे.’

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee marathi serial