मुंबई 11 ऑगस्ट : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुखने (Mayuri Deshmukh) आपल्या पतीच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. मयुरीने आशुतोष भाकरे (Ashutosh Bhakre) याच्याशी 2016 साली विवाह केला होता. दोघांचा ही अगदी सुखी संसार सुरू असताना मागील वर्षी अचानक आशुतोषने जगाचा निरोप घेतला. यामुळे मयुरीवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. तर आता ती स्वतःला यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान आज आशुतोषचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच्या आठवणीत तिने पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या अनेक आठवणीतील फोटोंचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. तर एक मोठी पोस्ट देखील लिहिली आहे.
View this post on Instagram
आशुतोष हा देखील एक अभिनेता आणि निर्माता होता. काही मराठी चित्रपटांत त्याने काम केलं होतं. मानसिक तणावातून त्याने राहत्या घरी आत्महत्या केली होती. बंगल्यातील वरच्या मजल्यावरील खोलीत त्याने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली होती. तर आशुतोष ला मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी त्याचे कुटुंबीय आणि मयुरी अतोनात प्रयत्न करत होते. शिवाय मयुरीने तिच्या कामातून ही ब्रेक घेतला होता. मात्र आशुतोष ने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
मयुरी मात्र आता या परिस्थितीला धीराने तोंड देताना दिसत आहे. व पुन्हा एकदा आपल्या कामाला तिने सुरुवात केली. स्टार प्लस वरील ‘इमली’ (Imli) या मालिकेत ती काम करत आहे. त्यातील तिची मालिनीची भूमिका हीट ठरताना दिसत आहे. मयुरीला झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment