‘घर से निकलतेही’ स्टार झाली गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड

‘घर से निकलते ही, कुछ दूर चलतेही, रस्ते मैं है उसका घर’ हे गीत आजही अनेकांना तोंडपाठ असेल. या गाण्यामुळे एका रात्रीत अभिनेत्री मयुरी कांगो स्टार झाली होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 2, 2019 12:01 PM IST

‘घर से निकलतेही’ स्टार झाली गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड

मुंबई, २ एप्रिल- ‘घर से निकलते ही, कुछ दूर चलतेही, रस्ते मैं है उसका घर’ हे गीत आजही अनेकांना तोंडपाठ असेल. या गाण्यामुळे एका रात्रीत अभिनेत्री मयुरी कांगो स्टार झाली होती. 'पापा कहते है' या सिनेमातलं हे गाणं होतं. या सिनेमातल्या मयुरीच्या लुकने लाखो तरुणांचं हृदय घायाळ केलं होतं.

मयुरीला पहिल्या सिनेमापासूनच लोकप्रियता मिळाली होती. मात्र त्यानंतरचे तिचे सिनेमे फारसे चालले नाहीत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी कंगो परफॉर्मिक्स डॉट रिझल्ट्रीक्स कंपनीच्या पब्लिसीस ग्रुपची मॅनेजिंग डायरेक्टर होती. नुकताच मयुरीने गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड म्हणून कार्यभार स्वीकारला.

तातडीने मयुरी तिच्या पदाचा कार्यभाग स्वीकारणार आहे. स्वतः मयुरीने afaqs.com या वेबसाइटकडे या बातमीला दुजोरा दिला आहे.

न्यूयॉर्क येथील ३६० आय या डिजीटल एजन्सीमधून मयुरीने तिच्या करिअरची सुरुवात केली. या कंपनीत ती मीडिया मॅनेजर म्हणून काम करत होती. तसेच डिजीटास कंपनीत मयुरीने मीडिया विभागाची असोसीएट डिरेक्टर मीडिया काम पाहिले आहे.

९० च्या दशकातल्या ही सुंदर अभिनेत्री अनेक वर्ष बॉलिवूडपासून दूर राहिली. 'पापा कहते है' आणि 'होगी प्यार की जीत' या दोन सिनेमांशिवाय तिचा एकही सिनेमा फारसा चालला नाही. २००० मध्ये आलेल्या वामसी या तेलगु सिनेमात ती दिली. मोठ्या पडद्यावर यश मिळत नाही म्हटल्यावर तिने आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला.

Loading...

‘नरगिस’ (२०००), ‘थोड़ा गम, थोड़ी खुशी’ (२००१), ‘डॉलर बाबू’ (२००१) आणि ‘किट्टी पार्टी’ (२००२) या मालिकांमध्ये काम केलं. मात्र इथेही तिच्या पदरी निराशाच पडली.

अखेर तिने २००३ मध्ये एनआरआय आदित्य ढिल्लनशी लग्न केलं आणि अमेरिकेत सेटल झाली. तिथे तिने एमबीएचं शिक्षण घेतलं आणि २००४ ते २०१२ पर्यंत नोकरी केली. मयुरीला ८ वर्षांच एक मुलगा आहे. त्याच्या जन्मानंतर ती भारतात परतली होती. भारतात परतल्यानंतरही तिने आपलं कुटुंब आणि नोकरीला प्राधान्य दिलं.

VIDEO: वडिलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क - पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2019 12:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...