• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • HBD: लग्नाच्या 7 वर्षानंतर रिद्धी डोगरा पतीपासून झाली होती विभक्त; 'मर्यादा'ने दिली होती ओळख

HBD: लग्नाच्या 7 वर्षानंतर रिद्धी डोगरा पतीपासून झाली होती विभक्त; 'मर्यादा'ने दिली होती ओळख

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून रिद्धी डोगराला(Ridhi Dogra) ओळखलं जातं. रिद्धीला 'मर्यादा'(Maryada) या मालिकेतून विशेष ओळख मिळाली होती.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून रिद्धी डोगराला(Ridhi Dogra) ओळखलं जातं. रिद्धीला 'मर्यादा'(Maryada) या मालिकेतून विशेष ओळख मिळाली होती. हि अभिनेत्री आज आपला ३६ वा वाढदिवस (Birthday Today) साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्रींच्या खाजगी आयुष्याबद्दल थोडं जाणून घेऊया.
  View this post on Instagram

  A post shared by ℎ (@iridhidogra)

  छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्र्यांपैकी एक म्हणून रिद्धी डोगराला ओळखलं जातं. रिद्धीचा जन्म २२ सप्टेंबर १९८४ मध्ये दिल्ली येथे झाला होता. रिद्धी अभिनेत्री बनण्याआधी एक उत्तम डान्सर होती. इतकंच नव्हे तर शामक डावर इन्स्टिट्यूटमध्ये डान्सर म्हणून काम करत होती. तसेच इंडस्ट्रीमध्ये तिने अभिनेत्री नव्हे तर एक सहाय्यक-निर्माता म्हणून पाऊल ठेवलं होतं. त्यांनतर तिने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला होता. रिद्धीने २००७ मध्ये 'झुमे जिया रे' या कार्यक्रमातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. मात्र रिद्धीला खरी ओळख मिळाली ती 'मर्यादा' या मालिकेतून. या मालिकेमध्ये रिद्दीने प्रियाची भूमिका साकारली होती. (हे वाचा:HBD: 'कुछ कुछ होता है' फेम अंजली आज झालीय फारच बोल्ड; शाहरुखची ऑनस्क्रीन मुलगी..) रिद्धी डोगराने आपला सह कलाकार राकेश बापटसोबत लग्न केलं होतं. हि जोडी छोट्या पडद्यावरील अनेक प्रसिद्ध जोड्यांपैकी एक होती. सोशल मीडियावर सतत या जोडीच्या लव्हस्टोरीचे किस्से ऐकायला मिळत असत. अनेक लोक या जोडीला आयडल कपल म्हणून बघत होते. मात्र अचानक या जोडीने अचानक विभक्त होण्याचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यांच्या या निर्णयाने अनेक चाहत्यांची मन दुखावली होती. त्यांच्या मित्र-परिवारसोबतचं चाहत्यांनाही हे पटन खूपच कठीण होतं. कारण एकमेकांवर इतकं प्रेम करणार हे कपल अचानक विभक्त होऊ शकतं हे कोणालाही पचण्यासारखं नव्हतं. (हे वाचा:अंकिता लोखंडे-विकी जैनचा रोमान्स; KISS करत फोटो केला शेअर) रिद्धी डोगरा आणि राकेश बापट यांनी खूपच धामधूममध्ये आपलं लग्न केलं होतं. सुरुवातीची काही वर्षे या दोघांनी अत्यंत उत्तम पद्धतीने घालवली. मात्र त्यांनतर यांच्यामध्ये काही खटके उडू लागले होते. आणि अचानक २०१९ मध्ये म्हणजे लग्नाच्या तब्बल ७ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला होता. यानंतर यांनी स्वतः मीडियासमोर याचा खुलासा केला होता. तसेच आपण पत्नी-पत्नी नसलो तरी एक चांगले मित्र असल्याचं आणि आयुष्यभर मित्र म्हणून राहणार असल्याचं म्हटलं होतं. तसेच आपण हा निर्णय एकेमकांच्या सहमताने घेतला असल्याचंही सांगितलं होतं.
  Published by:Aiman Desai
  First published: