अखेर मरेल चाहत्यांचा फेवरेट आर्यन मॅन, मार्वेलने स्वतः केला खुलासा

अखेर मरेल चाहत्यांचा फेवरेट आर्यन मॅन, मार्वेलने स्वतः केला खुलासा

यावर्षी मार्वेलचा सर्वात मोठा सिनेमा 'एवेंजर्स एंड गेम' प्रदर्शित होत आहे. मार्वेलचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, २१ एप्रिल- यावर्षी मार्वेलचा सर्वात मोठा सिनेमा 'एवेंजर्स एंड गेम' प्रदर्शित होत आहे. मार्वेलचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जगभरातच नाही तर भारतातही या सिनेमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळते. याचाच फायदा घेत निर्माते सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. टीझर व्हिडीओ पाहून प्रत्येकजण सिनेमात नक्की काय होणार याचा अंदाज बांधत आहेत. पण ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते उत्साही तर आहेतच शिवाय थोडे चिंतीतही दिसले होते पण आता त्यांच्या जीवात जीव आला.

ट्रेलर पाहताना सिनेमात आर्यन मॅनचा मृत्यू होतो असे प्रर्थमदर्शनी दिसते. चाहत्यांचा आवडता टोनी स्टार्क अर्थात आर्यन मॅन सिनेमात जिवंत राहणार हे कळल्यावर त्यांच्या जीवात जीव आला. पण आता नवीन एका व्हिडीओमुळे ते पुन्हा चिंतेत गेले आहेत.

मार्वेलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात आर्यन मॅनचे आतापर्यंतचे सर्व अवतार दाखवण्यात आले आहेत.

तसेच या व्हिडीओला जे कॅप्शन देण्यात आले आहे ते फार उत्सुकता निर्माण करणार आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘प्रत्येक प्रवासाचा एक शेवट असतो.’ हा व्हिडीओ आणि त्याचं कॅप्शन हेच सांगतं की मार्वेल सिनेमासोबत अनेक गोष्टींचाही शेवट होणार आहे.

पहिल्या भागात काय झालं?

पहिल्या भागात अर्थात एवेंजर्स इनफिनिटी वॉरमध्ये थॅनोजला पाचही मणी मिळतात. थॅनोजच्या विजयासोबत अर्ध जग नष्ट होतं आणि सुपरहिरोही मारले जातात. आता या शेवटच्या भागात कॅप्टन मार्वेलच्या मदतीने बचावलेले सुपरहिरो थॅनोजला टक्कर देतील की नाही हा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2019 02:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading