मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

केवळ व्हिसा मिळविण्यासाठी लग्न केलं; राधिका आपटेचा खुलासा

केवळ व्हिसा मिळविण्यासाठी लग्न केलं; राधिका आपटेचा खुलासा

लग्नसंस्थेवरही विश्वास नसल्याचे राधिका आपटेचे म्हणणे आहे

लग्नसंस्थेवरही विश्वास नसल्याचे राधिका आपटेचे म्हणणे आहे

लग्नसंस्थेवरही विश्वास नसल्याचे राधिका आपटेचे म्हणणे आहे

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 25 ऑक्टोबर : हिंदी-मराठी चित्रपटांसह नेटफ्लिक्सवर गाजणाऱ्या राधिका आपटेचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तिने एक खुलासा केला आहे. व्हिसा मिळविण्यासाठी मी लग्न केलं. अन्यथा लग्नसंस्थेवर माझा विश्वास नसल्याचे तिने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. अभिनेता विक्रांत मेस्सीच्या इन्स्टाग्रामवर राधिका व विक्रांतचा प्रश्न उत्तरांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या मुलाखतीदरम्यान विक्रांतने राधिकाला तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, व्हिसा मिळणं हे अवघड आहे. मात्र लग्न केल्यामुळे व्हिसा मिळणं सोपं होतं. त्यामुळे मी लग्न केलं. अन्यथा लग्नसंस्थेवर माझा विश्वास नाही. आम्हाला दोघांना एकत्र राहायचं होतं. त्यामुळे व्हिसा मिळणं आवश्यक होतं आणि व्हिसासाठी लग्न करणं गरजेचं होतं, असं ती सांगते.
View this post on Instagram

Say hello to Netflix's new Massey-iah. #VikFlix @netflix_in @radhikaofficial

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey87) on

हे ही वाचा-ड्रग्ज घेताना प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला पकडले रंगेहात! NCB ची धडक कारवाई
हिंदी-मराठी चित्रपटांमधील आपल्या कामाबरोबरच नेटफ्लिक्समधील वेबसीरिजमुळे राधिका आपटे चर्चेत आली. राधिकाने 2012 मध्ये ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. सध्या ती लंडनला असते. या वर्षी ब्रेक घेतल्याने काम करीत नसल्याचे तिने या मुलाखतीत सांगितले. अनेकदा तिची ओळख ही नेटफ्लिक्समुळे झाली असल्याचे बोलले जाते. मात्र अशी प्रसिद्धी तिला योग्य वाटत नाही. माझी ओळख माझ्या चांगल्या कामामुळे झाली असल्याचे ती सांगते.
First published:

पुढील बातम्या