News18 Lokmat

Anniversary च्या शुभेच्छा देण्याचा 'विरुष्का' चा हा अंदाज पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

विश्वास बसत नाही की लग्नाला एक वर्ष झालं. ही कालचीच गोष्ट असल्यासारखं मला वाटत आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2018 04:37 PM IST

Anniversary च्या शुभेच्छा देण्याचा 'विरुष्का' चा हा अंदाज पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

नवी दिल्ली, ११ डिसेंबर २०१८- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी ११ डिसेंबरला दोघांनी इटलीत लग्न केले होते. यावेळी विरुष्का जोडीने इन्स्टाग्रामवर आपल्या लग्नाच्या खास क्षणांना उजाळा दिला.


लग्नाच्या वर्षपूर्तीबद्दल विराटने इन्स्टाग्रामवर अनुष्काला टॅग करत म्हटले की, ‘विश्वास बसत नाही की लग्नाला एक वर्ष झालं. ही कालचीच गोष्ट असल्यासारखं मला वाटत आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी सर्वात जवळची मैत्रीण आणि लाइफ पार्टनर अनुष्का.’ यावेळी विराटने इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो शेअर केले. हे फोटो ट्विटरवरही शेअर करण्यात आले.Loading...


 

View this post on Instagram
 

Can't believe it's been a year already because it feels like it happened just yesterday. Time has truly flown by. Happy anniversary to my best friend and my soulmate.Mine forever ❤ @anushkasharma


A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on


अनुष्कानेही तिच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी लग्नाच्या आठवणींना उजाळा देत एक व्हिडिओ शेअर केला. अनुष्कानेही हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना विराटसाठी लिहिले की, ‘जर तुम्हाला हे वर्ष कसं गेलं कळलं नाही तर हे तुमच्यासाठी स्वर्ग सुख आहे. जेव्हा तुम्ही एका चांगल्या माणसासोबत लग्न करता तेव्हा ते स्वर्ग सुखच असतं.’
 

View this post on Instagram
 

It's heaven, when you don't sense time passing by ... It's heaven, when you marry a good 'man' ... 💞


A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on


विरुष्काला त्यांच्या चाहत्यांना आणि मित्रांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेटर रिद्धिमान सहाने दोघांच्या रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, ‘तुम्हाला आयुष्यातील सर्व सुख, शांती आणि प्रेम मिळो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.’


विरुष्काने गेल्या वर्षी इटलीतील टस्कनी शहरात राजेशाही थाटात लग्न केले होते. त्यांच्या लग्नात एकूण ४५ जणच सहभागी झाली होती. लग्नानंतर दोघांनी दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शन दिले होते. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील नावाजलेल्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...