S M L

'बाहुबली'नंतर येणार 'मणिकर्णिका: दी क्वीन आॅफ झांसी'

हुबली'च्या टीम ने वाराणसीच्या पवित्र घाटावर आपल्या 'मणिकर्णिका: दी क्वीन आॅफ झांसी' या चित्रपटाचे पोस्टर लाँच केलं. या चित्रपटामध्ये बॉलीवूड 'क्वीन' अभिनेत्री कंगना राणावत मुख्य भूमिकेत आहे.

Sachin Salve | Updated On: May 6, 2017 07:45 PM IST

'बाहुबली'नंतर येणार 'मणिकर्णिका: दी क्वीन आॅफ झांसी'

06 मे : बाहुबली'च्या टीम ने वाराणसीच्या पवित्र घाटावर आपल्या 'मणिकर्णिका: दी क्वीन आॅफ झांसी' या चित्रपटाचे पोस्टर लाँच केलं. या चित्रपटामध्ये बॉलीवूड 'क्वीन' अभिनेत्री कंगना राणावत मुख्य भूमिकेत आहे. 'कंगना 'राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे.

झांसीची राणी लक्ष्मीबार्इंचे मुळं नाव मणिकर्णिका तांबे होते. यामुळे 'मणिकर्णिका: दी क्वीन आॅफ झांसी' या चित्रपटाच्या पोस्टर लाँचसाठी वाराणसीची निवड करण्यात आली.

कंगनाचा हा पहिला ऐतिहासिक चित्रपट आहे. पुढील वर्षी २७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कर्ष हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून या चित्रपटाची पटकथा लिहिलीय के व्ही विजयेंद्र यांनी. के व्ही विजयेंद्र यांनी अलीकडे प्रदर्शित बाहुबली -2 आणि बजरंगी भाईजान या सिनेमांची पटकथा लिहिली होती.

मणिकर्णिकाचा जन्म 1828 ला वाराणसीमध्ये झाला. राजा गंगाधरराव नेवलकरांसोबत लग्न झाल्यानंतर झांसी आली आणि तिचं नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आलं. इंग्रजाना टक्कर देण्यारी मणिकर्णिका ही नंतर झांसीची राणी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2017 07:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close