प्रिया वारियरमुळे मार्क झकरबर्ग इन्स्टाग्रामवर पडला मागे!

अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरला फक्त एका गाण्यामुळे सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्धी मिळाली पण आता प्रियाच्या भुवया उंचावण्याचा फटका फेसबूकचा संस्थापक मार्क झकरबर्गलाही बसलाय.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 23, 2018 09:50 AM IST

प्रिया वारियरमुळे मार्क झकरबर्ग इन्स्टाग्रामवर पडला मागे!

23 फेब्रुवारी : अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरला फक्त एका गाण्यामुळे सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्धी मिळाली पण आता प्रियाच्या भुवया उंचावण्याचा फटका फेसबूकचा संस्थापक मार्क झकरबर्गलाही बसलाय. इन्स्टाग्रामवर सध्या मार्क झकरबर्गच्या फॉलोअर्सची संख्या चाळीस लाख इतकी आहे तर प्रियाच्या फॉलोअर्सची संख्या आता वाढून 45 लाखांपर्यंत गेली आहे. म्हणजेच मार्क झकरबर्गलाही प्रियाने मागे टाकलं आहे.

फॉलोअर्सच्या शर्यतीत प्रिया सोनम कपूर, प्रियांका चोप्राच्याही पुढे आहे. प्रियाची वाढती क्रेझ पाहून आता नेटीझन्सच्या भुवया उंचावल्यात.

'उरु अदार लव्ह' या चित्रपटातील 'मनिक्य मलरया पूवी' या गाण्यामुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेल्या प्रियाच्या फॉलोअर्सचा आकडा झपाट्याने वाढला.

वाढती लोकप्रियता आणि सध्या तिचाच ट्रेंड पाहता येत्या काळात प्रियाच्या फॉलोअर्सचा आकडा वाढण्याची चिन्हं आहेत. अवघ्या ९१ पोस्ट्सच्या बळावर प्रियाने इतके चाहते कमावले आहेत. पदार्पणापूर्वीच प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असणाऱ्या या अभिनेत्रीच्या सिनेमा कारकिर्दीकडेच आता कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2018 09:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close