पाकिस्तानाशिवाय जगभरात भाग्यश्रीच्या मुलाचा पाहता येणार सिनेमा

पाकिस्तानाशिवाय जगभरात भाग्यश्रीच्या मुलाचा पाहता येणार सिनेमा

‘मर्द को दर्द नहीं होता’ सिनेमाचं जगभरात कौतुक केलं जात आहे. भारतातही या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

  • Share this:

मुंबई, २६ मार्च- ‘उरी-द सर्जिकल स्ट्राइक’च्या प्रचंड यशानंतर, आरएसव्हीपीच्या नुकताच प्रदर्शित झालेला 'मर्द को दर्द नहीं होता’ सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया, न्यूजीलैंड, ताइवान, सिंगापुर, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, दक्षिण अफ्रीका, जपान या देशांमध्येही प्रदर्शित व्हायला सज्ज झाला आहे.

ताइवानमध्ये सर्वात जास्त स्क्रिन या सिनेमाला देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ताइवानमध्ये कोणत्याही बॉलिवूड सिनेमाला एवढ्या स्क्रिन देण्यात आल्या नव्हत्या. येत्या काही आठवड्यांमध्ये हा सिनेमा चीन आणि यूएसएमध्येही प्रदर्शित करण्यात येणार आहे.

‘मर्द को दर्द नहीं होता’ सिनेमाचं जगभरात कौतुक केलं जात आहे. भारतातही या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अभिमन्यु दासानी, राधिका मदान, गुलशन देवैया, महेश मांजरेकर आणि जिमित त्रिवेदीने यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दासानी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमातील हिरोला कोणतीही दुखापत झाल्यावर दुखत नसतं. दुखणं काय असतं हेच मुळात त्याला माहीत नसतं. सिनेमात पॉवर पॅक अॅक्शन आणि हसवायला लावणारे विनोद पाहायला मिळतील.

मामी फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाला स्टॅडिंग ओवेशन मिळालं होतं. अतिशय दुर्दम्य आजाराने पीडित मुलाची असामान्य कथा सांगण्यात आली आहे. अभिमन्यु दासानी आणि राधिका मदान यांनी या सिनेमात मार्शल आर्टसोबत अनेक अॅक्शन स्टंट करताना दिसत आहेत. तर गुलशन देवैया या सिनेमात खलनायक आणि मार्शल आर्ट तज्ज्ञाची भूमिका साकारताना दिसतो.

सहा भाषेत बोलते धोनीची लेक; पाहा बाप-लेकीचा 'हा' VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2019 08:40 PM IST

ताज्या बातम्या