• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • राणा दा फेम हार्दिक जोशीच्या घरी नवीन मालकीणबाईंची एंट्री, उत्साहात केलं स्वागत

राणा दा फेम हार्दिक जोशीच्या घरी नवीन मालकीणबाईंची एंट्री, उत्साहात केलं स्वागत

सर्वांचा लाडका राणा दा फेम हार्दिक जोशीने (hardeek joshi) दिवाळी निमित्ताने एक मोठी खरेदी केले आहे. म्हणजे त्याच्या परिवारात आता एक नव्या सदस्याची म्हणजे चारचाकीची एंट्री झाली आहे.

 • Share this:
  marathitv-actor-hardeek-joshi-buy-new-car diwali 2021 मुंबई, 6 नोव्हेंबर- सगळीकडे दिवाळीची धामधूम आहे. दिवळीनिमित्त पाडव्याच्या दिवशी अनेक जण नवीन वस्तू तसेच वाहन खरेदी किंवा घर खरेदी करत असतात. सर्वांचा लाडका राणा दा फेम हार्दिक जोशीने (hardeek joshi) देखील याच निमित्ताने एक मोठी खरेदी केले आहे. म्हणजे त्याच्या परिवारात आता एक नव्या सदस्याची म्हणजे चारचाकीची एंट्री झाली आहे. त्याच्या नव्या गाडीचं त्यानं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे. हार्दिकने इन्स्टावर याचा व्हिडीओ शेअर केला आहे.पाडव्याच्या मुहूर्तावर हार्दिकने नवी कार खरेदी केली आहे. हार्दिकच्या या खास व्हिडीओवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
  अभिनेता हार्दिक जोशी सध्या झी मराठीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सिध्दार्थाची भूमिका साकारताना दिसत आहे. राणा दा प्रमाणेच प्रेक्षक त्याच्या या नव्या भूमिकेवरही प्रचंड प्रेम करत आहेत. या मालिकेत त्याने पूर्ण वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांकडून त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. हार्दिक सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. मालिकेतील कलाकारांसोबत तो विविध रील शेअर करत असतो. आजही लोक राणा दा म्हणून त्याच्यावर प्रेम करतात. या भूमिकेने तो महाराष्ट्राच्या घरघरात आणि प्रेक्षकांच्या मनात पोहचला. वाचा : विकीची एक्स गर्लफ्रेंड सुंदरतेत कतरिनाला देते मात, हॉलिवूडमध्ये केलंय काम हार्दिकचा जन्म पुण्यात झाला, 2009 साली मुंबईतील गुरुनानक खालसा कॉलेज आर्ट्समधून हार्दिकने त्याचे शिक्षण पूर्ण केले. त्या लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. शाळा कॉलेजमध्ये तो नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायचा. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अभिनयाचे क्षेत्र करिअर म्हणून निवडले आणि तो मुंबईत आला. सुरुवातीच्या काळात त्याने 2012 साली स्टार प्रवाहाच्या ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मालिकेत एक छोटीशी भूमिका केली. मात्र त्या भूमिकेने त्याला जास्त फायदा झाला नाही. पुढे तो अशा अनेक लहान भूमिकांमध्ये दिसला. त्याने मकरंद अनासपुरे यांच्यासोबत ‘रंगा पतंगा’ या चित्रपटात ‘एसीपी पाठक’ची भूमिका साकारली होती. वाचा : Bhaubeej 2021: 'या' आहेत मराठी कलाविश्वातील बहीण-भावांच्या जोड्या हार्दिकने अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ ह्या सिनेमाच्या टायटल सॉन्गमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याकडून त्याने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. हिंदीत मनासारख्या भूमिका मिळत नसल्यामुळे हार्दिक मराठी मालिकांकडे वळला. हार्दिकने ‘अस्मिता’, ‘राधा ही बावरी’, ‘दुर्वा’ यासारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच इतकंच नाही तर त्याने’ क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमातही छोटेखानी भूमिका केली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: