मुंबई, 18 मार्च- मराठमोळा सुप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी अप्रतीम आणि दर्जेदार अभिनयानं अनेक मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. जितेंद्र जोशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. जितेंद्र जोशीच्या आईचा आज वाढदिवस आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त जितेंद्र जोशीनं एक भावुक कविता पोस्ट केली आहे. ही कविता त्याने सर्व मातांना समर्पित केली आहे. त्याची ही कविता वाचून डोळे पाणावतील अशीच आहे.
जितेंद्र जोशीनं त्याच्या आईसोबतचे सुंदर फोटो पोस्ट केले आहे. आईसोबतचे सुंदर क्षण शेअर करत त्याने म्हटलं आहे की, मेरी मां का जन्मदिन है आज उसके उपलक्ष में मेरी ये भेंट ..मेरी और सभी की माताओं के लिए ।
" मां "
जीव जहां जन्मा यह
पनपा जिसके गर्भागार में
क्या उसको दे पाऊं, किस विधि
प्रकट करूं आभार मैं
हाथ पकड़ सिखलाती जो
पहले अक्षर का पहला ज्ञान
शब्द कौनसे लाऊं नए मैं
कासे करूं उसका सम्मान
थामे उंगली चले चली जो
चाल मुझे जिसने बतलाई
जहां जहां मुझको जाना था
बिन पूछे जो साथ में आई
मात पिता की सेवा भी की
बंधु बहन का धर्म निभाया
सबके कारण कष्ट किए पर
कभी नहीं उसको जतलाया
अपनी रोटी स्वयं कमाई
मान कमाया नाम कमाया
मेहनत का आभूषण पहनो
दया रखो, यह मंत्र सिखाया
चाहे जितना नमन करूं मैं
चाहे जितनी बार कहूंगा
प्यार तेरा लौटाने जितने
जतन करूं पर कर ना सकूंगा
मां आखरी चाह मेरी है
इसको भी तुम पूरी करना
जब तक मेरी आंख है ज़िंदा
खुद को उससे दूर ना करना ''
– जितेंद्र शकुंतला जोशी
जितेंद्र जोशीचा गोदावरी' सिनेमा हा प्रत्येक कुटुंबाला जोडणारा असून आयुष्यात कुटुंब, नाती किती महत्वाची असतात, याची नव्याने ओळख करून देणारी ही गोष्ट आहे. जितेंद्र जोशींच्या या सिनेमाची सगळीकडं जोरजार चर्चा झाली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये या सिनेमानं आपलं स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षकांनी देखील याला चांगली पसंती दर्शवली.
अभिनेता कवी जितेंद्र जोशी त्याच्या दमदार अभिनय कौशल्याची कमाल नाटक, टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही दाखवली आहे. दुनियादारीमधील साई असो किंवा मग तुकाराम चित्रपटातील संत तुकारामांची चॅलेजिंग भूमिका, प्रत्येक भूमिकेला जितेंद्र जोशी तितक्याच सहजसुंदर अभिनयाने न्याय देतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.