VIDEO: लवकरच येतोय 'समांतर 2' चा ट्रेलर; पाहा स्वप्नील जोशीची खास पोस्ट

VIDEO: लवकरच येतोय 'समांतर 2' चा ट्रेलर; पाहा स्वप्नील जोशीची खास पोस्ट

अभिनेता स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांची ‘समांतर’ ही वेबसिरीज 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

  • Share this:

मुंबई, 17 जून-  अभिनेता स्वप्नील जोशी(Swapnil Joshi) गेल्यावर्षी ‘समांतर’ (Samantar) या वेबसिरीजमध्ये झळकला होता. ही वेबसिरीज प्रेक्षकांना खुपचं आवडली होती. थरारक असणाऱ्या या कथानकाने सर्वांनाचं खिळवून ठेवलं होतं.समांतरच्या या रोमांचक अनुभवानंतर प्रेक्षकांना त्याच्या दुसऱ्या भागाची खुपचं आतुरता होती. काही दिवसांपूर्वीचं आपल्याला ‘समांतर 2’ (Samantar 2)  येत असल्याची माहिती कलाकार आणि टीमने दिली होती. आत्ता लवकरच ‘समांतर 2’ चा ट्रेलरसुद्धा रिलीज होणार असल्याची माहिती स्वप्नील जोशीने पोस्टद्वारे दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

अभिनेता स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांची ‘समांतर’ ही वेबसिरीज 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या रहस्यमयी वेबसिरीजने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली होती. स्वप्नील आणि तेजस्विनीसोबत अभिनेता नितीश भारद्वाजसुद्धा यामध्ये मुख्य भूमिकेत होते. सतीश राजवाडे यांनी याचं दिग्दर्शन केलं होतं. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर आत्ता ‘समांतर 2’ लवकरच आपल्या भेटीला येत आहे. स्वनिल जोशीने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेयर करत 21 जूनला ट्रेलर रिलीज होणार असल्याचं सांगितल आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

(हे वाचा:'त्या' हिंदी निर्मात्यांवर कारवाई करण्याची धमक दाखवा'अमेय खोपकरांचा सरकारला टोला   )

काही दिवसांपूर्वी स्वप्नीलचा एक व्हिडीओसुद्धा जोरदार व्हायरल झाला होता. यामध्ये तो ‘समांतर 2’ चं डबिंग करताना दिसून आला होता. त्यामुळे भाग 2 लवकरच येणार असल्याचं म्हटलं जात होतं. आता स्वप्नीलच्या या पोस्टनंतर चाहत्यांची उत्सुकता आणखीनचं वाढली आहे.

(हे वाचा:रोहित रॉय होता सुष्मिताचा बॉयफ्रेंड?, पाहा अभिनेत्याची VIRAL पोस्ट  )

‘समांतर’ मध्ये एकूण 9 एपिसोड होते. केवळ 9 एपिसोडमध्येचं चाहते इतके खिळून राहिले होते. या 9 एपिसोडमध्ये स्वप्नील अनेक कोडे उलघडायाचा प्रत्यन करताना दिसला होता. आता भाग 2 मध्ये कोणती नवी रहस्ये असणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. तत्पूर्वीचं स्वप्नीलने पोस्ट करत , ‘दोन काळ, दोन व्यक्ती आणि एक रहस्य...पाहा पुढे काय घडणार कुमारच्या आयुष्यात...असं म्हणत स्वप्नीलने आणखीचं उत्सुकता वाढवली आहे.

Published by: Aiman Desai
First published: June 17, 2021, 1:27 PM IST

ताज्या बातम्या