मुंबई, 10 मार्च: सध्या वेबसिरीजचा(webseries) सुळसुळाट चालू आहे. कोरोना काळात थिएटर्स बंद असल्यामुळे सर्वच लोकांना वेबसिरीज पाहण्याचं वेड लागलं होत. असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. या काळात अनेक वेबसिरीजना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होत. आणि लोकांची हीच आवड अजूनसुद्धा जोपासली जात आहे. आत्तासुद्धा अनेक हिंदी, मराठी वेबसिरीज चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. यातच अजून एका जुन्या मात्र नव्याने परतणाऱ्या वेबसिरीजची भर पडली आहे. ती म्हणजे प्रिया बापट(priya bapat) आणि उमेश कामात (umesh kamat)यांच्या 'आणि काय हवं'?(aani kay hava) या मराठी वेबसिरीजची .
'आणि काय हवं' ही मराठी वेबसिरीज तरुणाई मध्ये खूपच प्रसिद्ध झाली होती. यामध्ये अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामात या पती-पत्नीची जोडी होती. ही जोडी प्रेक्षकांना चांगलीचं पसंत पडली होती. प्रेक्षकांनी या वेबसिरीजला भरभरून प्रेम दिलं होतं. त्यामुळेच त्याचा दुसरा भागसुद्धा तयार करण्यात आला होता. प्रेक्षकांच्या या तुफान प्रतिसादामुळे आत्ता 'आणि काय हवं' वेबासिरीजच्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे.
नुकताच प्रिया बापटनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रीकरण सुरु झाल्याचा फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रिया बापटसह, उमेश कामत, दिग्दर्शक वरूण नार्वेकर, रणजीत गुगळे, अनिश जोग आणि अमोल साळुंखे हेसुद्धा आहेत्त.
वरुण नार्वेकर दिग्दर्शित ही वेबसिरीज चाहत्यांच्या आवडीची बनली आहे. याच्या पहिल्या भागात जुही आणि साकेतचं खुलणारं प्रेम, प्रेमाचे अनेक गोड किस्से दाखवण्यात आले होते. ही स्टोरी प्रेक्षकांना इतकी आवडली कि त्याचा दुसरा भागसुद्धा करावा लागला. या दुसऱ्या भागात जुही आणि साकेतच्या लग्नाला 3 वर्ष झाली असून लग्नानंतर त्यांच्यात घडणाऱ्या गमतीजमती, रुसवेफुगवे नवरा-बायकोच्या नात्याच्या अनेक छटा यात दाखवण्यात आल्या होत्या. या दोन भागांवर प्रेक्षकांनी दाखविलेल्या प्रेमानंतर आत्ता याचा तिसरा भाग लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आज याच्या चित्रीकरणाचा शुभारंभही करण्यात आला आहे. आत्ता या तिसऱ्या भागात जुही साकेतच्या प्रेमाचा आणि नात्याचा कोणता रंग बघायला मिळणार याकडे चाहत्यांच लक्ष लागलं आहे. या विबासिरीजच्या तिसऱ्या भागासाठी चाहते चांगलेच आतुर झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.