मुंबई, 26 ऑक्टोबर : मराठमोळ्या अभिनेत्री वर्षा दांदळे (Marathi actress varsha dandale) या गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात 22 सप्टेंबर रोजी त्यांचा (Varsha dandale accident)अपघात झाला होता. त्यामुळे त्यांच्या पाठीच्या मणक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. ही बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचली आणि त्यांनी या बातमीची दखल घेऊन महापौर किशोरी पेडणेकर यांना वर्षा दांदळे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यास नाशिकला पाठवले होते. या अपघातानंतर त्यांना कसल्याही प्रकारची हालचाल करणे शक्य नव्हते. आज जवळपास एक महिन्यानंतर त्यांच्या तब्येतीत काहीशी सुधारणा होताना दिसत आहे. या काळाच त्यांच्या मुलीने खूप साथ दिली. आज त्यांच्या लेकीचा वाढदिवस आहे आणि यानिमित्तच त्यांनी लेकीसाठी एक भावनिक अशी पोस्ट लिहिली आहे.
आपल्या लाडक्या लेकीसोबतचा एक फोटो शेअर करत वर्षा दांदळे म्हणतात की, “Happy birthday dear daughter Tanmai, 22 सप्टेंबरला अपघात झाल्यावर हॉस्पिटल्स, सर्जन्स, सर्जनकडून होणाऱ्या ऑपेरेशन्सची माहिती, आणि ऑपेरेशन झाल्यावर कराव्या लागणाऱ्या physiotherapy चीं सर्व जबाबदारी एकहाती सांभाळणारी माझी लेक आज एक महिन्यानंतर मला आता टाइपही करता येतंय .. यावरून तिच्यातल्या physiotherapist चं महत्त्व लक्षात आले असेलच.. Happy birthday Tanu जशी आहेस तशीच रहा सेवाभावी”, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
View this post on Instagram
वर्षा दांदळे या मूळच्या अकोल्याच्या. लग्नानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. अभिनयाचा त्यांचा प्रवास खूपच उल्लेखनीय असाच आहे. संगीत शिक्षिकेची नोकरी करत असताना त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली वच्छी अत्याची भूमिका खूपच गाजली होती. याच नावाने त्यांना ओळख देखील मिळाली.
वाचा : कतरिनाचा विषय हार्ड! मराठीत 'भावा' म्हणत केली रणवीर सिंहची बोलती बंद
पुढे नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत त्यांनी लता काकूची भूमिका साकारली मग घाडगे आणि सूनमधील सुकन्या कुलकर्णीची मोठी जाऊ झाल्या. स्वामी समर्थांच्या कृपा-सिंधू या मालिकेतील सुंदरा बाई या भूमिकेने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली.
वाचा : वर्षा उसगांवकर धरणार ममता बॅनर्जींचा हात, गोव्यात करणार पक्षप्रवेश- सूत्र
शिवाय पाहिले न मी तुला मालिकेत उषा मावशी म्हणून गोड. प्रेमळ सासूचीही त्यांची भूमिका सर्वांना आवडली. याशिवाय वर्षा यांनी एकाच या जन्मी जणू, आनंदी हे जग सारे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये ही काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Tv serial