• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'गल्यानं साखली सोन्याची' हे मराठी कपल ठरतंय सुपरहिट; VIDEO झाले व्हायरल

'गल्यानं साखली सोन्याची' हे मराठी कपल ठरतंय सुपरहिट; VIDEO झाले व्हायरल

‘लागिर झालं जी’ या झी मराठी वाहिनीवर प्रचंड लोकप्रिय झालेल्या मालिकेतील आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण. नितीश हा अभिनया व्यतिरिक्त चांगला डान्सर ही आहे. त्यामुळे ती नेहमी असे डान्स व्हिडिओ शेअर करत असतो.

 • Share this:
  मुंबई 8 जुलै: छोट्या पडद्यावर मोठी लोकप्रियता मिळवणारा अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavan) सध्या फारच चर्चेत आहे. त्याचे डान्स व्हिडिओ (Dance video) खूपच व्हायरल होताना दिसत आहेत. अभिनेत्री श्वेता खरात (Shweta Kharat) सोबत तो हे व्हिडिओ बनवतो. त्यांची जोडी चांगलीच लोकप्रिय होताना दिसत आहे. ‘लागिर झालं जी’ या झी मराठी वाहिनीवर प्रचंड लोकप्रिय झालेल्या मालिकेतील आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण. नितीश हा अभिनया व्यतिरिक्त चांगला डान्सर ही आहे. त्यामुळे ती नेहमी असे डान्स व्हिडिओ शेअर करत असतो.

  गौतमी देशपांडेचा ग्लॅमरस अंदाज; नवा लुक होतोय व्हायरल

  ‘गल्यानं साखली सोन्याची’ या सुपरहिट गाण्यावर ते नृत्य करताना दिसत आहेत. अभिनेत्री श्वेता खरात ही देखील उत्तम नृत्यांगना आहे. त्यामुळे या दोघांची सुंदर डान्स केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
  काही दिवसांपूर्वीच या जोडीने धम्माल ‘अशी ही बनवा बनवी’ या सुपरहिट चित्रपटातील गाण्यांवर नृत्य केलं होतं. तो व्हिडिओ देखील प्रचंड लोकप्रिय झाला झाला होता.
  ‘लागिर झालं जी’ या मालिकेनंतर नितीश कोणत्या मालिकेत दिसला नाही मात्र त्याच्या नृत्य कलेमध्ये तो सक्रिय पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडिया वरही तो फार सक्रिय असतो. मालिकेनंतर त्याला मोठी प्रसिध्दी मिळाली होती.
  अभिनेत्री श्वेता खरात ही कलर्स मराठी वरील ‘राजा राणी ची ग जोडी’ या मालिकेत काम करत आहे. नितीश आणि श्वेताच्या अफेअरच्या बातम्या काही कालपासून येत आहेत. त्यामुळे ही जोडी सध्या सोशल मीडियावरही हीट ठरताना दिसतेय.
  Published by:News Digital
  First published: