मुंबई, 13 मार्च: झी मराठीवरील सुप्रसिद्ध मालिका 'तुझात जीव रंगला'(Tuzyat jeev rangala) मध्ये राणादाची(rana da) वाहिनी म्हणजेच नंदिता वाहिनीच्या (nandita)भूमिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजेचं धनश्री काडगावकर(Dhanshri kadgaonkar). धनश्रीनं नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. धनश्री सतत आपल्या मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकताच धनश्रीनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. धनश्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतं आहे.
या व्हिडीओमध्ये धनश्रीने आपल्या मुलाला हातात घेतलं आहे. आणि एक सुरेख अशी अंगाई गात ती आपल्या मुलाला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. सोबत आपल्या मुलासोबत नृत्यसुद्धा करत आहे. असा हा व्हिडीओ धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. पोस्टखाली तिनं '7 ते 7 ड्युटी, आणि हा अजून एक याला झोपवण्याचा प्रयत्न' असं कॅप्शन लिहिलं आहे.धनश्री सध्या आपलं मातृत्व खूपच एन्जॉय करताना दिसत आहे.
धनश्री आपल्या प्रेग्नन्सीपासूनंच अनेक पोस्ट सोशल मीडियावर करत होती. आणि आता बाळाच्या आगमनानंतर सुद्धा ती अशा गोड पोस्ट आपल्या चाहत्यांसाठी करत आहे.
(
हे वाचा:मसाबाचा आई-वडिलांबरोबरचा Unseen Photo: 'वेगळ्या' फॅमिलीबद्दलची पोस्टही VIRAL)
धनश्री ही मूळची पुण्याची आहे. तिनं दुर्वेश देशमुख याच्याशी लग्न केलं आहे. दुर्वेश हा एक इंजिनिअर आहे. दुर्वेश सोबतचेही फोटो ती सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. यातून त्यांच्या नात्यात असलेला गोडवा दिसून येतो.
धनश्रीने गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ, माझिया प्रियाला प्रीत कळेना अशा मालिकांमधून काम केलं आहे. तसेच तिनं महाराष्ट्राचा सुपरस्टार या डान्स शोमध्येही सहभाग घेतला होता. मात्र धनश्रीला खरी ओळख दिली ती म्हणजे' तुझात जीव रंगला' या मालिकेने ही मालिका कोल्हापूरच्या मातीवर आधारलेली होती. यात धनश्रीने नंदिता गायकवाड हे कोल्हापुरी ठसकेबाज पात्र साकारलं होतं. कोल्हापुरी भाषेत तिचं बोलणं, वहिनीसाहेब म्हणून तिचा असलेला तो दरारा आणि तिचा कसदार अभिनय यामुळे हे पात्र प्रेक्षकांना खूपच पसंत पडलं होतं.
त्याचबरोबर धनश्रीनं झोपी गेलेला जागा झाला, आधी बसू मग बोलू यांसारख्या नाटकातसुद्धा काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.