• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचं निधन; मोती साबणाच्या 'अलार्म काकां'नी ठसवली होती ओळख

ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचं निधन; मोती साबणाच्या 'अलार्म काकां'नी ठसवली होती ओळख

Vidyadhar Karmarkar Passed Away अनेक जाहिराती, चित्रपट मालिकांमधले गोड आजोबा करमरकर यांनी वठवले होते. मराठी चित्रपटसृष्टीतले सर्वात वयोवृद्ध कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर:  मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर (Vidyadhar Karmarkar Passed Away)  यांचं सोमवारी निधन झाले. अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमधून त्यांनी काम केलं होतं. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. ते 96 वर्षांचे होते. चित्रपट, मालिकांबरोबरच अनेक जाहिरातीही त्यांनी केल्या होत्या. मराठी मनोरंजनविश्वात त्यांची सर्वांत वयोवृद्ध कलाकार म्हणून ओळख होती. दिवाळीच्या आधी हमखास टीव्हीवर लागणाऱ्या मोती साबणाच्या जाहितातीत 'अलार्म काका' ही त्यांची ओळख ठसली होती. ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’या जाहिरातीमधील ‘अलार्म काका’ म्हणून ते घराघरात लोकप्रिय झाले. मराठी मनोरंज विश्वामध्ये करमरकर आबा म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात तसेच अनेक जाहिरातीतही काम केले आहे. आबा म्हणून त्यांना संपूर्ण सिनेसृष्टीत ओळखले जात होते. अनेक हिंदी चित्रपटात ते वडील किंवा आजोबांच्या भूमिकेत पाहायला मिळायचे. फक्त चित्रपट नव्हे तर त्यांच्या जाहिरातीही प्रचंड गाजल्या आहेत. या सिनेमात केले आहे काम केवळ मराठीच नाहीतर हिंदीतील काही चित्रपट आणि जाहिरांतीमध्ये देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. करमरकर यांनी आतापर्यंत ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक सिनेमांत त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट यासारख्या जाहिरातीत त्यांनी काम केले आहे. दरवर्षी दिवाळीदरम्यान टीव्हीवर प्रसिद्ध होणारी उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली… ही मोती साबणाच्या जाहिरातीत ते झळकले होते. त्यात त्यांनी अलार्म काकांची भूमिका साकारली होती. वाचा : फूलराणी 'मस्तानी'सोबत बॅडमिंटन कोर्टवर, सिंधू-दीपिकाने गाळला घाम, PHOTO आणि VIDEO VIRAL विद्याधर करमरकर यांच्या निधनावर सिनेसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. ते मुंबईतील विलेपार्ले या ठिकाणी राहत होते. त्यांनी सुरुवातीला नोकरी करुन अभिनयाची आवड जोपासली होती. त्यानंतर अनेक नाटकांमध्येही त्यांनी काम केले. त्यासोबत काही चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: