Home /News /entertainment /

मराठीतली ही फ्रेश जोडी लवकरच दिसणार मोठ्या पडद्यावर; नव्या सिनेमाची घोषणा

मराठीतली ही फ्रेश जोडी लवकरच दिसणार मोठ्या पडद्यावर; नव्या सिनेमाची घोषणा

मराठी सिनेसृष्टीतील हँडसम अभिनेता वैभव तत्ववादी आणि सर्वांची लाडकी ऋता दुर्गुळे (Hruta durgule) लवकरच एक नवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

  मुंबई, 25 सप्टेंबर: फुलपाखरू मालिकेतील ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) रंगभूमीवरची अभिनेत्री. सध्या पुन्हा एकदा मन उडू उडू झालं या मालिकेतून (man udu udu zala actress) ती पुढे आली आहे. मराठीतला हँडसम हिरो आणि हिंदीतही काम केलेला हिरो वैभव तत्त्वावादी याच्याबरोबर ऋता दिसणार आहे. मराठीतल्या या फ्रेश जोडीने सोशल मीडियावर आम्ही येत आहोत, अशी अनाउन्समेंटच केली आहे. Hruta Durgule  हिनं तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता नवीन चित्रपट येणार असल्याचं तिनं सोशल मीडियावर सांगितलं आहे. वैभव तत्ववादीने (Vaibhav Tatwawadi) मराठी सिनेसृष्टीत तर आपली जादू तर दाखवलीच, पण त्याचबरोबर काही सुपरहिट हिंदी चित्रपटातही त्याने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. आज दिनांक 25 सप्टेंबर ला वैभवचा वाढदिवस होता, या वाढदिवसानिमित्त वैभवने एका नवीन प्रोजेक्ट ची घोषणा त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून केली आहे. वैभव लवकरच एका नवीन चित्रपटातून आपल्याला 'ऋता दुर्गुळे' सोबत दिसणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by CINEGOSSIPS (@cinegossips)

  वैभव तत्ववादी ने इंस्टाग्राम वर शेअर केले फोटो... 25 सप्टेंबर या दिवशी वैभव ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वाढदिवसानिमित्त आपल्या एका नवीन प्रोजेक्ट ची घोषणा केली. त्याने आपल्या इंस्टा वर पहिल्यांदाच 'ऋता दुर्गुळे' सोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचे सांगितले आहे. आणि तिच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मला आनंद होत आहे, असेही तो म्हणाला. मराठमोळ्या रेणुका शहाणेंना इंडस्ट्रीत 34वर्षे पूर्ण; खास VIDEO शेअर करत.... ऋतानं देखील शेअर केले वैभव सोबतचे फोटो... सर्वांची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही लवकरच आपल्याला एका नवीन प्रोजेक्टमध्ये अभिनेता 'वैभव तत्ववादी' सोबत पहिल्यांदा दिसून येणार आहे. तिनं वैभवला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान चे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती असं म्हणतेय, मला खूप आनंद होतोय तुम्हाला सांगायला की मी लवकरच वैभव सोबत एका नवीन प्रोजेक्ट मधून तुमच्या समोर येणार आहे. लवकरच ऋता आणि वैभव तत्ववादी या दोघांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दोघंही एकमेकांसोबत पहिल्यांदाच काम करून प्रेक्षकांसाठी देखील ही जोडी अगदी फ्रेश असणार आहे. अद्यापही त्यांच्या या नवीन प्रोजेक्ट विषयीची अधिक माहित समोर आलेली नाही आहे. मात्र या दोघांच्या सोशल मीडिया पोटनंतर सर्व चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
  First published:

  पुढील बातम्या